सांगली : सध्या द्राक्ष हंगाम संपला असून (Vineyard) बागांची छाटणी ही झाली आहे. यंदा उत्पादनात तर घट झालीच आहे पण आता (Grape) द्राक्ष तोड पूर्ण झाल्यानंतरही (Unseasonable Rain) अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. त्यामुळे द्राक्ष बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हंगामात झालेले नुकसान बाजूला सारुन शेतकऱ्यांनी आता छाटणीला सुरवात केली होती. मात्र, छाटणी सुरु असतानाच होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांच्या काड्यांचे नुकसान होत आहे. या पावसामुळे फुटलेल्या काड्यांना गर्भधारणा होत नाही असे जाणकरांचे म्हणणे आहे. छाटणी झालेल्या द्राक्षबागा वर गारपीट झालेल्या परिसरात पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे.
न हंगामात तर अवकाळीने द्राक्ष उत्पादकांची पाठ सोडली नाही पण हंगाम संपल्यानंतरही हे संकट कायम राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागांच्या काड्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काड्या फुटल्या आहेत. या फुटलेल्या काड्याना गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा न झाल्यामुळे द्राक्ष लागतच नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान होत आहे.
नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्षाचे नुकसान झाले तर किमान विम्याच्या स्वरुपात मदत मिळावी या उद्देशाने शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. मात्र, पीक विमा योजनेचा कालावधी मार्च पर्यंत असतो आणि जरी विमा योजनेच्या आठ महिन्यांच्या कालावधीत द्राक्ष बागेचे नुकसान झाले. तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. कारण पीक विमा योजनेचे निकष कंपनी हिताचे असल्याचा आरोप खराडे यांनी केला आहे. त्यामुळे कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देऊन उत्पादकांच्या पदरी भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
यंदा हंगाम सुरु झाल्यापासून द्राक्षावर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे ती आता हंगाम संपल्यानंतरही कायम आहे. यामुळे उत्पादनात आणि द्राक्षांच्या दरातही घट झाली आहे. यामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांनी पुन्हा द्राक्ष छाटणीला सुरवात केली होती. किमान आगामी काळात तरी उत्पादन वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, हे देखील निसर्गाला मान्य नसल्याचे दिसून येत आहे. आता होत असलेल्या नुकसानीचा परिणाम थेट आगामी द्राक्ष उत्पादनावर होणार असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
Success Story : नांदेडच्या शिवारात फुललीय फणसाची बाग, 7 वर्षाची मेहनत यंदा आली कामी
Pune : मशागतीविना शेती, तरुण शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात
Sugarcane : उसाची तोड झाली, मग खोडव्याचे व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा