Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

| Updated on: Apr 21, 2022 | 3:55 PM

बाजारपेठेतील शेतीमालाचे दर कधी कमी-जास्त होतील हे सांगता येत नाही. शेतीमालाच्या किंमतीवर सरकारच्या निर्णयाचाही मोठा प्रभाव असतो. तसाच प्रकार सध्या तुरीच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. कारण सरकारने मुक्त तुरीच्या आयातीला मुदत वाढवून दिले आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत इतर देशातून मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होण्यास सवलत असणार आहे. याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर झालेला आहे. मध्यंतरी बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत होता.

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!
तुरीच्या दरात घसरण सुरुच आहे. सरकारच्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : बाजारपेठेतील (Agricultural prices) शेतीमालाचे दर कधी कमी-जास्त होतील हे सांगता येत नाही. शेतीमालाच्या किंमतीवर (Central Government) सरकारच्या निर्णयाचाही मोठा प्रभाव असतो. तसाच प्रकार सध्या (Toor Rate) तुरीच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. कारण सरकारने मुक्त तुरीच्या आयातीला मुदत वाढवून दिले आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत इतर देशातून मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होण्यास सवलत असणार आहे. याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर झालेला आहे. मध्यंतरी बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत होता. पण केंद्राने हा निर्णय घेतल्यामुळे दरात तब्बल 600 रुपयांची घसरण झाली आहे. शिवाय अजून ती सुरुच आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागणार आहे. कारण खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आलेला आहे.

तुरीच्या आवकवरही परिणाम

तुरीच्या दरात झपाट्याने घसरण सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शेतकरी आता दरवाढीची प्रतिक्षा करीत आहेत. तुरीच्या उत्पादनात घट होऊन देखील कवडीमोल दर मिळत असेल तर साठवणूक परवडली अशी धारणा शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभराच्या तुलनेत आवक घटलेली आहे. केंद्राच्या एका निर्णयाचा परिणाम स्थानिक पातळीवर पाहवयास मिळत आहे.

सोयाबीन, हरभऱ्याचे दर स्थिरावलेलेच

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आता आवक वाढत आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन हे 7 हजार 250 रुपयांवर स्थिरावलेले आहे. शिवाय आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली तर दरात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे साठवणूक केलेले सोयाबीन अखेर 7 हजार 250 रुपयांनी शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. तर दुसरी मोठ्या प्रमाणात आवक होणारा हरभरा देखील 4 हजार 450 रुपयांवर येऊन स्थिरावला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभरा याच शेतीमालाची अधिकची आवक होत आहे.

शेतीमालाची आवकही मर्यादितच

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यंदा उत्पादनात घट झाल्याचा परिणाम झाला आहे. तर शेतकऱ्यांचा कल हा साठवणूकीवरच अधिक आहे. वाढीव दरासाठी शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली असून तुरीची विक्री आता हमीभाव केंद्रावर होऊ लागली आहे.

संबंधित बातम्या:

PM Kisan Yojna : सर्वात मोठ्या कृषी योजनेत अनियमितता, लाखो अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ, आता वसुलीचे उद्दीष्ट

Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी

State Government : मेंढपाळांची भटकंती थांबणार, पशुधनविमा योजनेबाबत सरकारची भूमिका काय?

https://www.youtube.com/shorts/5iZvXAa6AJU