Turmeric : आवक वाढताच हळदीचा रंग ‘फिक्कट’, मुख्य बाजारपेठेत घसरले दर

| Updated on: May 09, 2022 | 3:41 PM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 3 ते 3 हजार 500 क्विंटल हळदीची आवक होत आहे. किमान दर 6 हजार 100 व कमाल दर 7 हजार 650 असून सरासरी दर हे 6 हजार 900 रुपये आहे.नांदेड,वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, बीड या जिल्ह्यातून सध्या आवक सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढल्याने केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच हळदी आवक ही घेतली जाते.

Turmeric : आवक वाढताच हळदीचा रंग फिक्कट, मुख्य बाजारपेठेत घसरले दर
हळदीची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.
Follow us on

हिंगोली : येथील (Hingoli Market) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संत नामदेव हळद मार्केट ही हळदीसाठी देशातील प्रसिध्द बाजारपेठ आहे. शिवाय देशात (Turmeric Area) हळदीचे क्षेत्र हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. येथील मार्केटमधील चोख व्यवहार व हैदराबादमध्ये सैदर्यप्रसाधने बनवण्यासाठीची मागणी यामुळे बाजार समितीमध्ये केवळ मराठावड्यातूनच नव्हे तर कर्नाटकाच्या काही भागातून (Turmeric Arrival) हळदीची आवक होत आहे. यंदा अधिकच्या पावसामुळे उत्पादनात घट होईल असा अंदाज होता पण उत्पादनात हळदीचा रंग गडद राहिला पण बाजारपेठेत तो टिकला नाही. कारण गेल्या आठ दिवसामध्ये हळदीचे दर 500 ते 600 रुपयांनी घसरले आहेत. हळद काढणी संपली असून सध्या होत असलेल्या आवकचा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे आहे हळदीचे मार्केट

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 3 ते 3 हजार 500 क्विंटल हळदीची आवक होत आहे. किमान दर 6 हजार 100 व कमाल दर 7 हजार 650 असून सरासरी दर हे 6 हजार 900 रुपये आहे.नांदेड,वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, बीड या जिल्ह्यातून सध्या आवक सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढल्याने केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच हळदी आवक ही घेतली जाते. पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला असला तरी हळदीवर प्रक्रिया केली की लागलीच विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

म्हणून हिंगोली बाजार समितीमध्ये विक्रमी आवक

हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटचे चोख व्यवहार म्हणजे वजन काटा झाला की शेतकऱ्यांच्या हाती पैस दिले जतात. शिवाय असेच व्यवहार शेतकऱ्यांसाठी चांगले असतात. शिवाय येथील हळदीचा सर्वाधिक उपयोग सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हैदराबाद येथील व्यापारीच अधिकची मागणी करतात. यंदा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला?

हळद काढून त्यावर प्रक्रिया झाली की लागलीच विक्री केली जात आहे. त्यामुळे आवक वाढत असून त्याचा परिणाम दरावर होत आहे. गतआठवड्यात आणि सध्या चालू आठवड्यात 500 ते 600 रुपयांनी दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रक्रिया केली असली तरी काही दिवस साठवणूक करुन दराचा अंदाज घेण्याचा सल्ला बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिला आहे.