लातूर : लातूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणून मांजरा नदीची ओळख आहे. आता नदीकाठच्या शेतजमिनीचे पूरामुळे नुकसानच झालेले आहे. त्यामुळे या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी तर पर्यावरणाचा समतोलही राखला जावा याअनुशंगाने नदीकाठच्या भागातील 100 एकरावर (Bamboo Cultivation Campaign) बांबू लागवडीचा निर्णय (District Administration) जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ज्या गावांमध्ये 100 एकरापेक्षा अधिकच्या क्षेत्रावर लागवड केली जाईल त्या गावाकरिता हा प्रकल्प राबवण्यासाठी 100 कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी.पी यांनी केली आहे. शनिवारी या अनोख्या मोहिमेला सुरवात झाली आहे.
बांबूची शेती हा नवा पर्याय मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. पोखरा योजनेअंतर्गत याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. 1 एकरातील बांबुमधून शेतकऱ्यांना 2 लाख 50 हजाराचे उत्पन्न मिळणार आहे. शिवाय हंगामी पिकाप्रमाणे यामध्ये कोणता धोका नसणार आहे. एका हेक्टरावरील बांबुसाठी केवळ 20 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर 1 टन बांबुपासून 200 लिटर इथेनॉलची निर्मिती होते. त्यामुळे हंगामी पिकांपेक्षा बांबू लागवड कधीही फायद्याचीच आहे. शिवाय काळानुरुप शेतीमध्ये बदल झाला तरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
लातूर तालुक्यातील सलगरा येथून बांबू लागवडीला शनिवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सुरवात झाली आहे. मांजरा नदीचा प्रवाह 720 किमीचा आहे तर लातूर जिल्ह्यातून 283 एवढ्या किमीचा प्रवास आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना बांबुची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे जमिनीची धूप होणार नाही शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्येही भर पडणार आहे. या प्रकल्पाची सुरवात लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे झाली आहे. यावेळी 40 शेतकऱ्यांनी 100 एकरावर बांबू लागवजडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लागवडीबरोबर शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, माजी आमदार पाशा पटेल उपस्थित होते
पोखरा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना बांबुलागवड करायची आहे. त्या शेतकऱ्यांना 5 एकरापर्यंत या योजनेअंतर्गत लागवड करता येणार आहे. पडीक तसेच चांगल्या क्षेत्रावरही बांबू लागवड करता येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. शिवाय जिल्ह्यामध्येच बांबूची रोपेही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. लागवडीनंतर महिन्याभरात पहिला हप्ता मिळणार आहे तर उर्वरीत निधी दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांबू लागवडीचे आवाहन केले होते त्यानुसार लातूर जिल्ह्यात या मोहिमेला सुरवात झाली आहे.
Untimely Rain : अतिवृष्टीने खरिपाचे तर आता अवकाळीने रब्बी पिकांचे नुकसान, अणखीन दोन दिवस धोक्याचेच
कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर