जळगाव : निसर्गाचा लहरीपणा त्यात पुन्हा करप्या रोगाचा प्रादुर्भाव घटलेले दर अशा अनेक संकटानंतर आता कुठे चित्र बदलत होते. वाढत्या उन्हामुळे (Banana Rate) केळीचे दर चांगले वाढले होते. अकोला आणि (Jalgaon District) जळगाव जिल्ह्यामध्ये 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत दर गेले होते. असे असताना केळी उत्पादकांसमोर एक नवेच संकट उभे राहत आहेत. अज्ञात चोरट्यांकडून (The banana garden was destroyed) केळी बागा उध्वस्त केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून आता केळी तोडणीचे काम चालू असतानाच असे प्रकार जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वाढत आहेत. त्यामुळे अथक परिश्रम अधिकचा खर्च करुनही आता अंतिम टप्प्यात अशा प्रकारचे नुकसान होत असल्याने या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रावेर पोलीस स्टेशन समोरच ठिय्या दिला होता.
कधी नव्हे ते केळीचा दर 1 हजारापेक्षा अधिकवर गेला आहे. शिवाय यंदा वाढलेल्या थंडी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे मागणीत मोठी घट झाली होती. पण फेब्रुवारी पासून केळी दराचे चित्र हे बदलत आहे. 400 रुपये क्विंटलवर असलेले दर आता 1 हजारावर गेले आहेत. शिवाय व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी झालेला आहे. पण हे नवेच संकट उभे राहिले आहे. अशा समाजकंटाकावर कारवाईची मागणी आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये हे खर्ची केले आहेत. पण या अज्ञात चोरट्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे. शेतकऱ्यांचे परिश्रम, केळीवर केलेला खर्च सर्वकाही मातीमोल होत आहे. एवढेच नाही केळी उध्वस्त करुन हे चोरटे शेतीसाहित्याची मोडतोड करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून रावेर तालुक्यात हा प्रकार वाढलेला आहे. त्यामुळे केळी बागायतदार त्रस्त आहेत.
अज्ञात चोरट्यांच्या या अजब प्रकारमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रावेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. दरम्यान, शेतकऱ्यांबरोबर खा. रक्षा खडसे तसेच स्थानिक आमदारही या आंदोलनात सहभागी झाले होते. चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त झाला तर केळीचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.
Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!