नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी अधिकाऱ्यांना दिले आदेश

| Updated on: Mar 20, 2023 | 10:30 AM

मागच्या आठ दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. केलेला खर्च सुध्दा निघत नसल्यामुळे शेतकरी मोठा चिंतेत आहे.

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी अधिकाऱ्यांना दिले आदेश
Beed collector
Image Credit source: tv9marathi
Follow us on

संभाजी मुंडे, बीड : बीडच्या (BEED) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आहेत. मागील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट (Unseasonal rain with hail) झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह फळबागेचं नुकसान झालं आहे. दरम्यान परळी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सेलू, गाडे पिंपळगाव यासह परिसरातील इतर गावात शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून कृषी अधिकाऱ्यांना (To the Agricultural Officers) पंचनामे करण्याचे आदेश दीपा मुधोळ यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मागच्या आठ दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. केलेला खर्च सुध्दा निघत नसल्यामुळे शेतकरी मोठा चिंतेत आहे. सरकारी मदतीकडं सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे यांनी केली गारपीग्रस्त भागाची पाहणी

बीड जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू हरभरा ज्वारीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कर्मचारी संपात आहेत त्यामुळे थोडी अडचण येईल. मात्र सरसकट मदत झाली पाहिजे, मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे. त्या भागातील आमदारांनी बांधावर जाऊन पाहणी केली पाहिजे असं आश्नासन शेतकऱ्यांना पंकजा मुंडे दिलं होतं.

beed collector deepa mudhol

सुषमा अंधारे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अंबाजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सध्याच्या सरकारवरती सडकून टीका केली. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर सुध्दा त्यांनी जोरदार टीका केली. राज्य सरकारने नुकतच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के सूट दिली. मात्र एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर महिलांना चारशे रुपयाला उपलब्ध करून दिला असता तर लोकांना त्याची अधिक मदत झाली असती असं त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची एसटी केलेल्या प्रवासाचे फोटो व्हायरल केले आहेत. तशी विशेष सोय इतर प्रवाशांना का मिळत नाही, त्याचबरोबर भाजपच्या काही नेत्यांना विशेष बसची सोय केल्याची खंत देखील त्यांनी बोलावून दाखवली.

हे सुद्धा वाचा