नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील नायगांव (Naigaon) मध्ये कृषी विभागाच्या (agricultural news) सतर्कतेमुळे साठ लाख रुपये किमतीचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. तसेच चाळीस लाख रुपये किंमतीचे ट्रकसह बियाणे जप्त करण्यात आले आहेत. नायगांव तालुक्यातील कोलंबी इथे सोयाबीनचे बनावट बियाणे तयार करून ते विक्रीसाठी नेले जात होते. गोदावरी सिडस अँड बायोटेक या नावाने हे बनावट बियाणे आढळून आले आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या बनावट बियाण्याच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये शेत शिवारातील काम उरकल्याने मजुरांच्या हाताला काम शिल्लक राहिलेलं नाही. मात्र रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने शेतमजुरांना दिलासा मिळालाय. ऐन उन्हाळ्यात मजुरांच्या हाथाला काम मिळाल्याने त्यांची आर्थिक अडचण दूर झालीय. सध्या नांदेडमध्ये ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची कामे ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येतायत. त्यामुळे मजूर वर्गाची गुजराण होण्यास मदत झाली आहे.
धाडी टाकने कृषी विभागाचे काम आहे. त्यासाठी स्पेशल अधिकाऱ्यांची नियुक्ती असते. जर अधिकाऱ्यांचे काम सचिव करत असतील, तर कृषी विभागाचे अधिकारी अंडे उबवायला ठेवले का ? सरकारचा त्यांच्यावर विश्वास नाही का ? कृषी विभाग, बियाणे कंपन्याचे साटेलोटे आहे. त्यांचा आतून व्यवहार सुरू आहे अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
हा शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करा. जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करा. अन्यथा 16 जूनला परिणाम भोगावे लागतील. ज्या धाडी टाकल्या जातात, त्या कारवाईसाठी की हफ्ता वाढवून घेण्यासाठी याचे स्पष्टीकरण कृषी विभागाने दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळला, तर लोक चौकात मारतील अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली.