Bhandara : भरधाव वेगाने निघालेला डंपरची दोन्ही चाकं निघाली, रात्रीच्या सुमारास घुसला दवाखान्यात, मग…

| Updated on: Mar 18, 2023 | 7:45 AM

शेष त्यावेळी तिथल्या परिसरात कोणी नव्हतं आणि दवाखान्याला ज्या बाजूने डंपर धडकला आहे. त्या बाजूला सुध्दा कोणी झोपलं नव्हतं. त्यामुळे कसल्याची प्रकारची जीवितहाणी झालेली नाही.

Bhandara : भरधाव वेगाने निघालेला डंपरची दोन्ही चाकं निघाली, रात्रीच्या सुमारास घुसला दवाखान्यात, मग...
dumper truck
Image Credit source: tv9marathi
Follow us on

भंडारा : भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या तुमसर मार्गे भंडाराकडे रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या एका डंपरची (dumper)समोरची दोन्ही चाके निघाली. त्यानंतर डंपर थेट एका दवाखान्यात (hospital) घुसला. ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे झालेल्या दुर्घटनेत कसल्याही प्रकारची जीवितहाणी झालेली नाही. परंतू डंपरची धडक इतकी जोराची होती की, त्यामध्ये दवाखान्याची एक भिंत पडली आहे. त्याचबरोबर तिथं असलेलं एक झाड सुध्दा उन्मळून पडलं आहे. अपघात झाला, त्यावेळी इतक्या जोरात आवाज झाला की, तिथल्या परिसरातील लोकांची बघण्यासाठी गर्दी झाली होती.

नेमकं काय झालं

डंपरचं चाक निखळल्याने थेट रुग्णालयाच्या भिंतीवर डंपर आदळला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात रात्री 1 च्या दरम्यान घड़ली असून यात भिंत तुटून जमीनदोस्त झाली. रात्र असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. या घटनेतील डंपरचालक निखिल ठवकर (25, खापा) याच्यावर तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्री मध्यप्रदेशातून रेती भरून भंडाराकडे जात असलेल्या टिप्परची समोरील दोन्ही चाके निखळली, वाहकाचे नियंत्रण सुटल्याने थेट डॉ. मधुसूदन गादेवार यांच्या रुग्णालयाच्या भिंतीला टिप्पर धडकला. यात भिंतीजवळील एक वृक्ष उन्मळून पडले. अपघाताची माहिती होताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करत गुन्हा नोंद केला आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील चौकशी सुरु…

विशेष त्यावेळी तिथल्या परिसरात कोणी नव्हतं आणि दवाखान्याला ज्या बाजूने डंपर धडकला आहे. त्या बाजूला सुध्दा कोणी झोपलं नव्हतं. त्यामुळे कसल्याची प्रकारची जीवितहाणी झालेली नाही. परंतु दवाखान्याचं नुकसान झालं आहे आणि एक वृक्ष उन्मळून पडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.