बुलडाणा: जिल्ह्यातील घाटावरील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतलं जाते. पावसाअभावी कसंबसं उगवलेल्या सोयाबीनवर आता नवीन संकट ओढवले आहे. सोयाबीन या पिकाला आता किडीनं ग्रासले आहे, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
जुलै महिन्यात मोजक्या ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली, त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपुढे पाऊस नसल्यामुळे संकट उभे राहिलं. ज्या शेतकऱ्यांनी आपलं पीक कसंबसं जगवलं. आता तर त्या पिकावर आता खोड पोखरणारी अळी, चक्रभुंगा या अळीने ग्रासले आहे. दुरून हिरवेगार दिसणार सोयाबीनचे हे शेत मात्र किड, खोड अळीने पोखरून निघतय.
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर ,कपाशी हे पीक घेतल्या जातं, खोड पोखरणारी अळीमुळे शेतकऱ्यांपुढे उगवलेलं पीक जगवण्याचे संकट उभं ठाकलंय. तसंच शेतकऱ्यांनी सोयाबीनला खोड पोखरणाऱ्या अळी पासून पीक विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी केलीय.
पीक विमा भरण्यास 15 जुलै अंतिम तारीख होती मात्र अनेक शेतकऱ्यांचा विमा न भरला गेल्याने 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 23 जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार आहे.
भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. भात पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
भुईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल.भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 520 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
मुग आणि उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात.
इतर बातम्या
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर
PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर
Buldana Farmers said soybean affected due to insects attack on crop demanded include in crop insurance