बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात कृषी विभागाने (agricultural department) चिखली (chikhali) येथे मोठी कारवाई केली आहे. चिखली एमआयडीसी भागात असलेल्या एका गोडाऊनवर काल रात्री बुलढाणा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी धाडीत तब्बल एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन बियाणांचा एक कोटी वीस लाख रुपये किमतीचा साठा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला. चिखली एमआयडीसी परिसरातील एका गोदामात अवैधरित्या सोयाबीन बियाणांचासाठा जमा केला जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती.
माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने एक पथक तयार करून त्या संबंधित गोडाऊन वर धाड टाकली. तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा सोयाबीन बियाणे त्या गोडाऊनमध्ये आढळून आले, त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याकरता बियाणांची साठवणूक केली जात असल्याचा हा प्रकार असल्याची सगळीकडं चर्चा आहे. याप्रकरणी कृषी विभागाकडून सदर गोडाऊन सिल करण्यात आले असून चिखली पोलीस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात खरीपाच्या तोंडावर बियाने साठवणुकीचं रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईने अवैधरित्या बियाणे साठवणूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. तर हे बियाणे ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचे असल्याचे माहिती जिल्हा कृषी अधीक्षक, मनोज ढगे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचे डोळे सध्या पावसाकडे लागले आहेत. खरीप हंगामाच्या मशीगतीची तयारी पूर्ण झाली असून शेतकरी सध्या कोणते बियाणे घ्यायचे या विचार करीत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. मागचे रब्बी आणि खरीप हंगाम पावासामुळे वाया गेले, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा चांगली तयारी केली आहे.