गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील सुनगाव येथे कृषी विज्ञान केंद्र जळगाव (Krishi Vigyan Kendra, Jalgaon) जामोदच्या वतीने संत्रा पिक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम (Orange Crop Management Training Program) संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे फळबागतज्ज्ञ शशांक दाते यांनी संत्रा पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन बहार व्यवस्थापन याविषयी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ यांनी संत्र्यावरील येणाऱ्या किडी तसेच रोगाचे व्यवस्थापन याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. या किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणी कशी करावी, याविषयी सुध्दा मार्गदर्शन करण्यात आलेय.
शेतकऱ्यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी विषमुक्त अन्न पिकवावे आणि दुर्धर आजारांपासून वाचावे या उद्देशाने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सालईबन येथे तीन दिवसीय सातपुडा बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायाळ सेंद्रिय शेती समूह, तरुणाई फाउंडेशन खामगांव यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये सेंद्रिय शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण, सेंद्रिय शेतमालाची मार्केटिंग, आरोग्यावरील परिणाम, शेतीवरील संत विचार, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, शेती विषयावरील महत्वाची पुस्तके, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, जागतिक स्तरावर भारतीय सेंद्रिय मालाची मागणी, देशी बीजांची उपलब्धता, आदी अनेक विषयांवर या दरम्यान माहिती देऊन चर्चा करण्यात आली, शेवटच्या दिवशी कृषी प्रदर्शनी, बारा बलुतेदारांची कार्यकुशलता, पथनाट्याने उत्साहात समारोप झाला.