चंद्रपूरच्या प्रगतशील शेतकऱ्याची उत्कृष्ठ नियोजनाची सांगड, वर्षाकाठी कमावला 50 लाखांचा नफा

| Updated on: Mar 09, 2021 | 2:59 PM

चंद्रपूरचे प्रगतशील शेतकरी मुरलीधर हूलके यांनी वर्षाकाठी 50 लाखांचा नफा मिळवला आहे. Chandrapur farmer Murlidhar Hulke

चंद्रपूरच्या प्रगतशील शेतकऱ्याची उत्कृष्ठ नियोजनाची सांगड, वर्षाकाठी कमावला 50 लाखांचा नफा
मुरलीधर हूलके, प्रगतीशील शेतकरी
Follow us on

चंद्रपूर: आधुनिक आणि पारंपरिक शेतीचे उत्कृष्ट नियोजन करुन चंद्रपूरच्या प्रगतशील शेतकऱ्याने वर्षाकाठी 50 लाखाचा नफा कमावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी येथील मुरलीधर हूलके, असं या प्रगतशील शेतकऱ्याचं नाव आहे. कापूस-तूर-सोयाबीन- मका- ज्वारी-हळद, सोप लागवड, जिरे, लसूण , भुईमूग आदींची पिके मुरलीधर हूलके घेतात. वरोरा तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी म्हणून हूलके यांची ख्याती आहे. (Chandrapur farmer Murlidhar Hulke earn 50 lakh rupees profit from farming)

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी येथील शेतकरी मुरलीधर हूलके यांनी त्यांच्या शेतातून वर्षाकाठी 50 लाखांचा नफा मिळवला आहे. शेतीमध्ये लागणारा पंचेचाळीस लाखांचा खर्च वजा करून अंदाजे 50 लाखांचा नफा मुरलधीर हूलके यांना झाला आहे. या परिसरातील उत्तम शेतीकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हूलके त्याच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात.

परिसरातील शेतकरी शेती पाहण्यासाठी माढेळीमध्ये

मुरलीधर हूलके त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रयोग करतात. वरोरा तालुक्यात हूलके यांच्या शेतीमधील प्रयोगांची चर्चा होत असते. हूलके यांचे शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी परिसरतातील शेतकरी आवर्जून येतात. मुरलीधर हूलके हे 50 वर्षाचे हाडाचे शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित शेती असून शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याची प्रभावी इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. त्यांना एकूण 45 एकर शेती असून शेतामध्ये विविध प्रकारची पिके ते घेतात.

300 क्विंटल हळदीवर प्रक्रिया

पारंपरिक पिकांमध्ये कापूस, तूर ,सोयाबीन, मका, ज्वारी घेत असून आधुनिक पद्धतीने हळद लागवड, सोप लागवड, जिरे, लसन , भुईमूग अशी पिके ते लावतात. त्यामुळे वर्षाकाठी त्यांचे आर्थिक उत्पन्न लाखोच्या घरात आहे. या वर्षी त्यांनी सात एकर मध्ये लसूण लागवड केली. यामध्ये त्यांना 5 लाख उत्पन्न मिळाले. हळद लागवड मध्ये 300 क्विंटल हळद प्रक्रिया करून विक्रीस तयार आहे. यातून त्यांना 30 लाख रुपये मिळाले.

140 क्विटंल कापूस उत्पादन

कापूस 140 क्विंटल 7 लाख, चना यामधून 2लाख , तुर 30 क्विंटल 2लाख,जीरे व ओवा या पिकातून 2लाख, सोप या पिकातून 2लाख उत्पन्न मिळाले. अशा पद्धतीने ते आपल्या शेतीचे नियोजन करून वर्षाकाठी अंदाजे45 ते 50 लाखाचे नफ्याची शेती ते करत आहे. त्यामुळे प्राप्त आहे ही शेती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी भेटी देऊन गेलेत. मुरलीधर हूलके यांना पीक लागवडीसाठी वरोरा तालुका कृषी विभागाची मदत आणि मार्गदर्शन मिळालं आहे.


संबंधित बातम्या:

चंद्रपूरच्या शेतकऱ्याची मिश्र शेतीमध्ये योग्य नियोजनाची सांगड; 7 एकरांमध्ये नवनव्या प्रयोगांनी प्रगती

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : चंद्रपुरात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के ग्रामपंचायतींवर विजय; वडेट्टीवारांचा दावा

(Chandrapur farmer Murlidhar Hulke earn 50 lakh rupees profit from farming)