Organic Farm : पीक पध्दतीमध्ये नव्हे शेती पध्दतीमध्येच बदल करा अन् उत्पादन वाढवा, उस्मानाबादच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी

| Updated on: Jun 25, 2022 | 3:05 PM

अजहर पठाण याचे वडिल अंबेजवळगे येथे पारंपरिक पध्दतीने शेती करुन मोसंबीमधून उत्पादन घेत होते. मात्र, परीश्रम, खताची मात्रा, पाण्याचे नियोजन एवढे करुनही अपेक्षित उत्पादन पदरी पडत नव्हते. त्यामुळे बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेतलेल्या अजहरने मोसंबी फळबागातूनच अधिकचे उत्पादन घेण्याचा निर्धार केला. रासायनिक खत बंद करुन सेंद्रिय खत, ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन आणि आवश्यक तेवढेच खत असा बदल केल्याने मोसंबीचा आकार, दर्जा आणि चकाकी आल्याने दरातही त्याचा फरक पडला.

Organic Farm : पीक पध्दतीमध्ये नव्हे शेती पध्दतीमध्येच बदल करा अन् उत्पादन वाढवा, उस्मानाबादच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी
मोसंबी फळबाग
Follow us on

उस्मानाबाद :  (Farm Production) शेतामधून उत्पादन वाढवण्यासाठी थेट पीक पध्दतीमध्येच बदल करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, उत्पादन कमी का याचा विचार न करता शेतकरी हे धाडस करतात. शिवाय केलेला प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. पण (Osmanabad) उस्मानाबाद शहराच्या जवळच असलेल्या एका तरुण शेतकऱ्यांने शेती करण्याच्या पध्दतीमध्येच बदल करुन (Production of orchards) फळबागाचे उत्पादन वाढवले आहे. मोसंबीच्या बागेत रासायनिक खताचा वापर बंद, पाण्याचे योग्य नियोजन, खताची मात्रा आणि अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करुन उत्पादनात 4 लाखांची भर टाकली आहे. अपेक्षित उत्पादनापेक्षा लाखो रुपये अधिकचे मिळाले ते केवळ योग्य नियोजन आणि सेंद्रिय शेती पध्दतीमुळे असा दावा अजहर पठाण यांनी केला आहे. त्यामुळे अजहर याची शेती आता कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे केंद्र बनली आहे.

तरुण शेतकऱ्याने कशी साधली किमया?

अजहर पठाण याचे वडिल अंबेजवळगे येथे पारंपरिक पध्दतीने शेती करुन मोसंबीमधून उत्पादन घेत होते. मात्र, परीश्रम, खताची मात्रा, पाण्याचे नियोजन एवढे करुनही अपेक्षित उत्पादन पदरी पडत नव्हते. त्यामुळे बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेतलेल्या अजहरने मोसंबी फळबागातूनच अधिकचे उत्पादन घेण्याचा निर्धार केला. रासायनिक खत बंद करुन सेंद्रिय खत, ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन आणि आवश्यक तेवढेच खत असा बदल केल्याने मोसंबीचा आकार, दर्जा आणि चकाकी आल्याने दरातही त्याचा फरक पडला. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत 4 लाखाचे अधिकचे उत्पादन मिळाले आहे. शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्षात बांधावर केल्याने काय होते हे अजहरने कृतीमधून दाखवून दिले आहे.

अत्याधुनिक पध्दतीने मोसंबीचा दर्जा सुधारला

फळबाग क्षेत्र तेवढेच पण आहे त्या मोसंबी फळाचे उत्पादन वाढवण्याचा अजहरने निर्धार केला. अगदी सुरवातीलाच रासायनिक खताचा डोस बंद केला. त्यामुळे वाढत्या उष्णतेमध्ये झाडे जळण्याचे प्रमाण शून्यावर आले. तर बदलत्या शेती पध्दतीमुळे मोसंबीचा आकार आणि दर्जामध्ये वाढ झाली. गुणवत्तेवर भर दिल्याने किलोमागे 25 रुपये अधिकचे मिळाले. त्यामुळे दरवर्षीपेक्षा 4 लाखाने उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे तरुणांनी अंग मेहनत करण्यापेक्षा अत्याधुनिक पध्दतीने शेती केली तर कष्ट कमी आणि उत्पन्न अधिक हे अजहरच्या प्रयोगातून स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा

अशी जोपासली बाग

मोसंबीच्या झाडामधील अंतर 18 बाय 18 एवढे आहे. आतापर्यंत ड्रीपच्या माध्यमातून पाणी दिले जात होते यामध्ये बदल करुन एका झाडाला 15 दिवसाला 150 लिटर पाणी दिले जात आहे. एवढेच नाहीतर वर्षातून दोन वेळेस शेणखत आणि गांडूळ खताची मात्रा दिली जात आहे. रासायनिक खताचा वापर पूर्ण बंद असल्याने गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. आता मोसंबी बागेची पाहणी आणि पध्दती जाणून घेण्यासाठी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी अजहरच्या शेतावर येत आहेत.