पुणे : पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. शिवाय हा बदल यशस्वी होताना दिसतोय. तर दुसरीकडे (Water to the crops) पिकांना पाणी देण्याचे तंत्रही बदलत आहे. 2018 ते 2022 या कालावधीत (Maharashtra) राज्यात 3 लाख शेतकऱ्यांनी स्प्रिंक्लर तर 2 दोन लाख 75 हजार शेतकऱ्यांनी (Drip Irrigation) ठिबक सिंचन बसवले आहे. शिवाय ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळलाच शिवाय अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत झाली आहे. ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानात वाढ केल्यानंतर शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. एवढेच नाही तर केंद्राबरोबर राज्यांनी आपल्या हिश्याची रक्कम अदा केल्याने शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळाले आहे. यामुळे मजूर टंचाईची समस्या मिटलेली आहे. ठिबक सिंचनामध्ये अत्याधुनिक प्रणाली आल्याने शेतकरी अॅटोमॅटिकवरच भर देत आहे.
सन 2020-21 मध्ये राज्यभरात 68 हजार हेक्टर हे सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे उत्पादनवाढीबरोबर अत्याधुनिक तंत्राकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शिवाय योजनेचा लाभ घेण्यातही शेतकऱ्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे राज्यातील 84 हजारहून जास्त शेतकऱ्यांना 156 कोटींचा लाभ मिळालेला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना राबवली जात असून आता तळागळापर्यंत जनजागृती झाली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ सर्वासामान्य शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.
ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी 176 कोटींच्या निधीचे अनुदान जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये यवतमाळ-6 कोटी, वाशिम 7 कोटी, वर्धा- 4 कोटी, सोलापूर 14.50 कोटी, सिंधुदुर्ग 5 लाख, सातारा 3.50 कोटी, सांगली 8.09 कोटी, रत्नागिरी 5 लाख, पुणे- 8 कोटी, परभणी 4 कोटी, पालघर-5 लाख, उस्मानाबाद 10 कोटी, नाशिक- 10 कोटी, नंदूरबार- 2कोटी, नांदेड- 8 कोटी, नागपूर 3 कोटी, लातूर-10 कोटी, हिंगोली 3 कोटी, गोंदिया 7 लाख, गडचिरोली 5 लाख, धुळे 5 कोटी, चंद्रपूर 1.80 कोटी, बुलडाणा 1.60 कोटी, भंडारा 16 लाख, बीड-८.70 कोटी, औरंगाबाद 2.70 कोटी, अमरावती 7.50 कोटी, अकोला 3 कोटी तर नगर 16 कोटी देण्यात आले आहेत.
सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.
-*यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.
– यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.
दिल्ली हे Smart Farming चे देशातील पहिले राज्य..! स्मार्ट फार्मिंगचा नेमका फायदा काय?
महागाईच्या वणव्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ, Basic गरजांच्या पूर्ततेसाठी तारेवरची कसरत\
Rabi Season : यंदाच्या सुगीमध्ये यंत्राचा वापर, मजूरांपेक्षा खर्च कमी अन् वेळेचीही बचत