छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस, गारपीट यांसह शेतीमाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करून मेटकुटीला आला असून आता तो मृत्यूला जवळ करत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदार शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. असे असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात मतदार संघात एका शेतकरी दाम्पत्यानं आपले जीवन संपविले आहे. ज्या काळ्या मातीत राब-राब राबले त्याच काळ्या मातीत एकाने गळफास लावून तर एकाने विषारी औषध सेवन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदार संघातील सोयगाव येथील शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीसह अवकाळी पाऊस, गारपीटीला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. संदीप आळेकर आणि लताबाई आळेकर असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचचं नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आत्तापर्यन्त सात शेतकऱ्यांनी आपली जिवनयात्रा संपवली आहे. यामध्ये नुकताच ज्या दाम्पत्याने आत्महत्या केली आहे ते सोयगाव येथील महालब्दा गावातील असून त्यांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी यांनी एक संतापजनक विधान केले होते. त्यावरून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा आता अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात आत्महत्येची घटना घडली आहे.
शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असं काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं होतं. त्यामध्ये आता अब्दुल सत्तार यांच्यात मतदार संघात आत्महत्या झाल्याने मोठा धक्का मानला जात आहे.
त्यातच अब्दुल सत्तार यांचा अवकाळी पाऊस आणि गारपीट जिथे झाली आहे तिथे पाहणी दौरा आयोजित केला आहे. यामध्ये अवघ्या काही मिनिटांत अब्दुल सत्तार हे पाहणी करून जात असल्याने शेतकरी देखील नाराजी व्यक्त करत आहे.
अशातच त्यांच्याच मतदार संघात आळेकर दाम्पत्याने आत्महत्या केली. यामध्ये पतीने गळफास लावून तर पत्नीने विष घेऊन केली आत्महत्या आहे. त्यामध्ये कर्जबाजारीपणा आणि गारपीट यामुळे ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे कृषीमंत्री त्यांच्याच जिल्ह्यात आत्महत्या रोखू शकत नाही राज्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न काय मार्गी लावणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून विरोधक देखील हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.