मुंबई : हिवाळा आता अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. (Climate change) वातावरणातील बदलानुसार शेतकऱ्यांनी शेतीकामामध्येही बदल करणे गरजेचे आहे. त्याचअनुशंगाने पुढील 4 दिवस हे महत्वाचे राहणार आहेत. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी काय कामे करावेत या संदर्भात पुसा (Indian Agricultural Research) भारतीय कृषी संशोधन शास्त्रज्ञांनी नवीन सल्ला दिला आहे. ज्यामुळे शेती पिकाचे नुकसान होणार नाही तर उत्पादनात वाढ होईल. या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार पिके आणि भाज्यांमध्ये हलके सिंचन करावे, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. शिवाय या दरम्यानच्या काळात पिकांची मशागत करुन नवीन (Vegetable Cultivation) भाजीपाला लागवड आणि वावरात उभ्या असलेल्या पिकांची कशी काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले आहे. भेंडीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ए-४, परबानी क्रांती, अर्का अनामिका आदी वाणांची निवड करावी. शिवाय लागवडीपूर्वी शेतात पुरेशी ओलाव्याची काळजी घेऊन बियाणे प्रमाण एकरी 10 ते 15 किलो याप्रमाणे घेऊन उत्पादनात वाढ करता येणार आहे. गव्हावर तांबोऱ्याचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. त्यामुळे डिथान एम-45 हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फावरणी करावे लागणार आहे.
सध्याचे कोरडे व वाढते तापमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सर्व भाजीपाला व मोहरीच्या पिकांमध्ये चेपाच्या आक्रमणावर लक्ष ठेवावे लागणार आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी ते भाज्या तोडणीच्या दरम्यान भाज्यांमध्ये इमिडाक्लोप्रिड o.25 ते 0.5 मिली/लिटर पाण्याची फवारणी करतात. फवारणीनंतर आठवडाभर भाजीपाला तोडणी करु नये. जमिनीत डुबलेल्या भाजीवर चेपाने केलेल्या हल्ल्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
हवामानाचा विचार करता सध्याचे तापमान उन्हाळी हंगामातील मुळा इत्यादींच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. कारण हे तापमान बियाणांच्या उगवणासाठी योग्य असते. या हंगामात मार्च महिन्यात मूग व उडीद पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित स्रोतातून प्रगत बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. मूगामध्ये -पुसा विशाल, पुसा बैसाखी, पीडीएम-11, एसएमएल-32, उडीद-पंत उडीद-19, पंत उडीद-30, पंत उडीद-35 आणि पीडीयू-1 हा वाण महत्वाचे आहेत. पेरणीपूर्वी, बियाण्यांवर पीक-विशिष्ट रायझोबियम आणि फॉस्फरस याचे द्रावण शिंपडून मिसळणे गरजेचे आहे.
हवामान लक्षात घेऊन शेतकरी या आठवड्यात टोमॅटो, मिरची, भोपळ्याची भाजी या तयार रोपांची लागवड करू शकतात. मात्र, बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर थ्रिप्सच्या चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा हा कीटक आढळून येताच अर्फेडर 0.5 मि.ली. हे प्रति 3 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे लागणार आहे. रोगाची लक्षणे आढळल्यास डायथेन-एम-45 हे ३ ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. तरच पिकाचे नुकासान टळणार आहे.
दुष्काळात तेरावा: हंगाम सुरु होऊनही द्राक्ष निर्यातीला कशाचा अडसर? नैसर्गिक संकटानंतरही समस्या कायम
Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!\