हवामान खात्याचा अंदाज अन् शेतकऱ्यांची लगीनघाई, शेतशिवारात नेमकं चाललयं तरी काय?

| Updated on: Mar 07, 2022 | 9:35 AM

हवामान खात्याचा अंदाज यावेळीही अचूक ठरतो की काय असेच चित्र सोमवारी सकाळी मराठवाडा आणि विदर्भात दिसून आले. दिवस उजाडताच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या सुगीचे दिवस सुरु झाले असले तरी बदलत्या वातावरणामुळे खरीप काढणीच्या दरम्यान जी परस्थिती ओढावली होती त्याची पुनरावृत्ती होणार का असेच वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, काढणीला आलेला हरभरा, ज्वारी पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे.

हवामान खात्याचा अंदाज अन् शेतकऱ्यांची लगीनघाई, शेतशिवारात नेमकं चाललयं तरी काय?
हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने रब्बी हंगामातील पीक कापणीला वेग आला आहे.
Follow us on

नांदेड : (Meteorological Department) हवामान खात्याचा अंदाज यावेळीही अचूक ठरतो की काय असेच चित्र सोमवारी सकाळी मराठवाडा आणि विदर्भात दिसून आले. दिवस उजाडताच (Cloudy Weather) ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या सुगीचे दिवस सुरु झाले असले तरी बदलत्या वातावरणामुळे खरीप काढणीच्या दरम्यान जी परस्थिती ओढावली होती त्याची पुनरावृत्ती होणार का असेच वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, काढणीला आलेला (Crop Harvesting) हरभरा, ज्वारी पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. विशेषत: हरभरा काढणी जोमात आहे. काढणी झालेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हरभऱ्याचे क्षेत्र वाढलेले आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादनवाढीची अपेक्षा असताना बदलत्या वातावरणाचा आता थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे ज्वारी काढणीलाही सुरवात झाली असून पावसाने हजेरी लावली तर ज्वारी कणसे काळवंडती अशी शंका कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केली आहे.

अवकाळी पुन्हा मुळावर उठणार

7 ते 10 मार्चपर्यंत या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. याची चाहूल सोमवारी सकाळपासूनच लागली आहे. अवकाळीमुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी ही पिके तर काळवंडणार आहेतच पण काढणी झालेल्या हरभऱ्याच्या दर्जावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान काढणी झालेल्या पिकांची सुरक्षित ठिकणी साठवणूक करणे गरजेचे आहे. सर्वाधिक धोका हा द्राक्ष बागांना आहे. द्राक्ष बागा बहरात आल्यापासून अवकाळीच्या घेऱ्यात आहेत. नाशिक, सांगली जिल्ह्यातील तोडणी झाली असली तरी उर्वरीत भागातील द्राक्ष तोडणीची कामे ही सुरु आहेत. आता पावसाने हजेरी लावली तर थेट द्राक्षांच्या मण्यांचेच नुकसान होणार आहे.

अख्खं कुटुंब राबतंय शेतशिवारात

सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी कामाला वेग आला आहे. एकीकडे ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे तर दुसरीकडे काढणी कामांसाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच अख्खं कुटुंब शेती कामात व्यस्त आहे. यंदा नांदेडमध्ये रब्बी हंगामात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र आहे, आता हरभऱ्याच्या पिकाची पूर्ण क्षमतेने वाढ झालीय. तर कडक उन्हामुळे हरभरा हा वाळून गेलाय, अश्या स्थितीत हवामान खात्याने पुढच्या तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या पावसात भिजून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बळीराजाचे अख्ख कुटुंब सध्या शेतात हरभरा कापणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसतंय.

वाशिममध्ये हंगामाची सुरवात अन् शेवटही नुकसानीचाच

रब्बीतील गहु, हरभरा, कांदा पिक संकटात असल्याने शेतकरीराजा चिंताग्रस्त झाला आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली असून गत वर्षभरापासून शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात फसला आहे. खरीप हंगामासह रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाही निसर्गाच्या अवकृपेने पिकांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील पिकाची काढणी सुरू झाली आहे. तर काही भागांत गहू पीकही परिपक्व होऊन काढणीच्या स्थितीत आला आहे. या पिकावर शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून आहेत.

संबंधित बातम्या :

खरिपात भासणार खतांचा तुटवडा, गतवर्षी अतिवृष्टीने तर यंदा खताअभावी उत्पादनावर परिणाम..!

कांदा बिजोत्पादन : बियाणांबरोबर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन, किडीवर मिळवा असे नियंत्रण..!

Rabi Season: कडधान्याचे पीक गतवर्षी साधले यंदा नेमके काय झाले? पीक पध्दतीमध्ये बदल करुनही निराशाच