नाशिक : द्राक्ष हंगामापासून सुरु झालेली (Unseasonable Rain) अवकाळीची अवकृपा अद्यापही कायम आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Nashik) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. सध्या (Onion Crop) उन्हाळी हंगामातील कांदा काढणी आणि छाटणीची कामे सुरु असतानाच अचानक झालेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील कांद्याचा वांदा हा बाजारपेठेत जाण्यापूर्वीच झाला आहे. एकीकडे घटत्या दरामुळे नुकसान होत असतानाच आता पावसाने कांदा भिजल्याने नासण्याची भीती व्यक्त होत आहे. फळबागामधून झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच आता नगदी पीक असलेल्या कांद्यातून पदरी निराशच पडत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
गेल्या काही दिवसापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वातावरण हे कोरडे होते. मात्र, बुधवारी रात्री अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदळ उडाली. सध्या उन्हाळी हंगामातील कांदा काढणी आणि छाटणीची कामे सुरु आहेत. शिवाय काढणी झालेला कांदा हा वावरातच पडून आहे. देवळा तालुक्यातील मेशी, महालपाटने, निंबोळा,देवपूरपाडे वासोळ आदी भागांत अचानक पाऊस आल्याने कांदा सुरक्षित ठिकणी घेऊन जाताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. कांदा भिजला तर ते न भरुन निघणारे नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा करुन कांदा सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न केले.
यंदा शेतकऱ्यांच्या पदरी एकही पीक पडू द्यायचे नाही असाच निर्धार अवकाळी पावसाने केला आहे काय ? असाच सवाल उपस्थित व्हावा अशी परस्थिती नाशिक जिल्ह्यात झाली आहे. महिन्यातून एकदा अवकाळी ही ठरलेलीच आहे. त्यामुळेच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचा संपूर्ण हंगामावर परिणाम झाला आहे. एकीकडे उत्पादन तर घटलेच पण दर्जाही घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. आता द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना अवकाळीचा शिकार उन्हाळी कांदा होत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी कांदा सुरक्षित ठिकाणीही नेऊ शकला नाही.
नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदाच्या उन्हाळी हंगामात पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे कांदा क्षेत्रात वाढ झाली होती. उन्हाळी कांदा आता काढणीला आहे. निसर्गाशी दोन हात करुन पीक सावरले तरी बाजारपेठेत कवडीमोल दराने विक्री करावे लागत आहे. कारण सध्या मालेगवा बाजारपेठेमध्ये 800 ते 1 हजार क्विंटल असा कांद्याला दर आहे.
Central Government : ‘ड्रोन’ शेतीला अखेर ग्रीन सिग्नल, काय असणार अटी-नियम? वाचा सविस्तर
Wheat Rate : गव्हाच्या वाढीव दराला खेडा खरेदीमुळे ‘ब्रेक’, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर