सोलापूर : मुख्य पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांनी (Seasonal Crop) हंगामी पिकांवर भर दिला. कमी काळात चार पैसे पदरी पडतील म्हणून जिल्ह्यातील अक्कोलकोट परिसरात (Watermelon) कलिंगडची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. दोन महिन्याचेच पीक म्हणून शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासले. अवकाळी, ढगाळ वातावरणातही योग्य ती फवारणी करुन पीक पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, (Corona Effect) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका उत्पादकांना बसलेला आहे. सध्या वावरात असलेले किलंगड खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर कलिंगड मार्केटमध्ये असते पण खरेदीच होत नसल्याने कलिंगड हे वावरातच पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रयत्न देखील फसला असून त्याचा परिणाम यंदाच्या लागवडीवर होणार आहे. व्यापाऱ्यांकडून केवळ 2 ते 3 रुपये किलोने मागणी होत आहे. कवडीमोल दराने विक्री केली तर झालेला खर्च देखील निघणे मुश्किल असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कलिंगड हे 60 दिवसाचे पीक आहे. हंगामी पिकातून चार पैसे मिळताततच म्हणून अक्कोलकोट परिसरात याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. लागवडीपासूनच औषध फवारणी, पाण्याचे नियोजन असा एकरी 50 ते 60 हजाराचा खर्च मात्र, उन्हाळ्याच्या तोंडावर मागणी होणार त्यामुळे उत्पादन निश्चित मानले जाते. पण यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि त्यानंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम थेट विक्रीवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरूच आहे. मुख्य पिकांमध्ये झालेले नुकसान हंगामी पिकातून भरुन काढण्याचा डावही अयशस्वी झाला आहे. त्यामुळे आता नव्याने कलिंगड लागवड करण्याचे शेतकऱ्यांचे धाडस होईना झाले आहे.
दोन महिने अविरत कष्ट करुन शेतकऱ्यांनी कलिंगडाचे उत्पादन घेतले पण आता बाजारपेठेमध्ये याची उलाढालच होईना झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण सांगत व्यापारी फडाकडे फिरकत नाहीत आणि आलेले व्यापारी हे 2 ते 3 रुपये किलोने मागणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. मागणी केलेल्या दराने विक्री केली तर खर्चही निघणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गतवर्षी दुसऱ्या लाटेत कलिंगड वावरातच नासून गेले होते. या दरम्यान, कलिंगड हे फुकटात वाटल्याचे शेतकरी भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
कलिंगड हे नगदी पीक असले तरी जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एकरी 50 हजार रुपये खर्ची करावे लागत आहे. उगवण झाल्यापासून औषध फवारणी पाण्याचे नियोजन हे तर आहेच पण यंदा वातावरणातील बदलामुळे फवारणी कायम करावी लागली होती. त्यामुळे खर्चात आणि मेहनतीमध्ये वाढ झाली होती. आता पीक पदरात आहे पण बाजारपेठेत त्याचे मुल्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम आहे.
शेतकऱ्याच असं जुगाड पाहून तुम्हीही होताल अवाक्, तासाभरातच पडीक जमिनही पेरणी योग्य, वाचा सविस्तर
Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी