जळगाव : आतापर्यंत कापसाचे दर आणि साठवूक याची चर्चा होती पण आता (Kharif Season) खरीप हंगामाचे वेध लागले असून यंदाच्या खरिपात कापूस लागवडीचे चित्र काय राहणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. (Cotton Rate) कापसाला मिळालेला विक्रमी दर आणि वाढती मागणी या दोन्ही बाबी यंदा (Cotton Cultivation) कापूस लागवडीसाठी पोषक राहणार आहेत. यंदाचा कापूस हंगामही देशासाठी चांगला राहणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. विक्रमी दरापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढले तरी विक्रीची हमी मिळत आहे. याच कारणामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.
उत्पादन वाढले तर दर कमी होणार याची धास्ती शेतकऱ्यांना असते, पण कापसाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण यंदा उत्पादन घटल्याने मागणी एवढा पुरवठा हा झालेलाच नाही. त्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढले तरी खरेदीविना त्याची परवेड होणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा अधिक की कापसाचा हेच पहावे लागणार आहे.
गेल्या काही वर्षापासून शेती उत्पादनात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे गतवर्षी सरासरीएवढेही कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांचे पदरी पडले नाही. यंदा तर पोषक वातावरण राहिले तर देशात 2 दशलक्ष टनांनी उत्पादन वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जगभरात लागवड क्षेत्राच वाढ तर निश्चित मानली जात आहे पण उत्पादन हे निसर्गावरच अवलंबून आहे.मात्र, कापूस उत्पादित झाला तर मात्र, शेतकऱ्यांचाच अधिकचा फायदा होणार आहे.
खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. यंदा सोयाबीनला सरासरीएवढा दर मिळाला तर कापसाच्या दरात दुप्पटीने वाढ झाली होती. त्यामुळे ज्या भागात कापसाकडे दुर्लक्ष केले गेले होते त्या क्षेत्रात आता काय होणार हे पहावे लागणार आहे. यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ ही निश्चित मानली जाते. पण शेतकऱ्यांनी जो पीक पध्दतीमध्ये बदल केला जाणार आहे त्याचा फायदा होईल की नाही हे पहावे लागणार आहे.