नांदेड : यंदा (Cotton Production) कापासाचे उत्पादन घटले असले तरी विक्रमी दर मिळालेला आहे. कधी नव्हे तो 11 हजार रुपये क्विंटलने कापसाची खरेदी झाली आहे. वाढीव दराचा केवळ शेतकऱ्यांनाच फायदा नाही तर (Market Committee) बाजार समित्यांच्याही उत्पादनात भर पडली आहे. गेल्या 50 वर्षात जो दर (Cotton Rate) कापसाला मिळालेला नाही तो यंदा पदरी पडला होता. त्यामुळे उत्पादन घटले असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षांपेक्षा अधिक मिळाले आहे. तर दुसरीकडे अधिकच्या खरेदीमुळे बाजार समित्यांनाही शुल्क स्वरुपात लाखोंचा निधी मिळालेला आहे. त्यामुळे एकाच पिकाचा असा दुहेरी फायदा झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादच्या बाजार समितीमध्ये गेल्या 4 महिन्यांमध्ये 89 हजार क्विटंल कापसाची आवक झाली होती. या बदल्यात बाजार समितीला 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
हंगाम सुरु होण्यापूर्वीच कापसाचे उत्पादन घटले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मागणी वाढणार आणि चांगला दरही मिळणार हे अपेक्षित असताना शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरलेली आहे. वाढीव दर मिळत असतानाही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला त्यामुळे बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे. अपेक्षित दरवाढ होत नाही तोपर्यंत विक्री नाही ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने 6 हजारावरील दर थेट 10 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र सुरु होऊनदेखील बाजार समित्याच्या परिसरातच व्यापारी कापासाची खरेदी करु लागले यामुळे बाजार समितीला सेस अर्थात शुल्क मिळत नव्हते. त्यामुळे बाजार समित्यांनी कापसाची विक्री ही लिलाव पध्दतीने करण्याचे ठरवले. शिवाय त्यावर बाजार समिती शुल्क ही आकारणार असल्याचा निर्णय घेतला. याला शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळाला. लिलाव प्रक्रियेत अधिकचे दर मिळत गेले आणि दुसरीकडे बाजार समितीला मिळणाऱ्या शुल्कात वाढ होत गेली.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला केवळ शुल्कच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांमध्ये 36 लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याचे सभापती राम पाटील बन्नाळीकर यांनी सांगितले आहे. या कालावधीमध्ये 89 हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. शिवाय शेतकऱ्यांना लागलीच पैसे मिळत गेल्याने विश्वास वाढत गेला. बाजार समितीनेही 75 क्विंटल कापूस प्रोसेसिंग करणाऱ्या जिनिंग फॅक्टरीला विकला तर 14 हजार क्विंटल कापूस बाहेरील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी पाहिजे, मग आता नाही होणार फसवणूक..! कृषी पणन मंडळाचा रामबाण उपाय
Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा