उस्मानाबाद: उत्पादन वाढीसाठी आता पोषक हंगामाच असावे असे काही नाही. तर पिकासाठी(favorable Environment) अनुकूल वातावरण तयार करुनही उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात याचा प्रत्यय आला आहे. म्हणूनच उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. पण यापूर्वीच कळंब तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने बाजारपेठेचे गणित ओळखून कडाक्याच्या थंडीमध्ये एका एकरामध्ये (Watermelon Cultivation) कलिंगडाची लागवड केली होती. कलिंगड हे हंगामी पीक असून अडीच महिन्यात पीक पदरात पडते पण या दरम्यान योग्य प्रकारे जोपसणा झाली तरच हे शक्य आहे. हाच प्रयोग खडकीचे विजयकुमार राखुंडे यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. डिसेंबरच्या शेवटी त्यांनी एका एकरात लागवड केलेल्या कलिंगडातून केवळ 80 दिवसांमध्ये त्यांना 4 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थिती निर्माण झाली तरी वेगळी वाट निवडल्याने काय होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
उत्पादन वाढवणे आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणे हे जरी शेतकऱ्यांच्या हाती असले तरी बाजारपेठ आणि दर हे शेतकऱ्यांच्या हाती नाही. त्यामुळेच उन्हाळ्याच्या तोंडावर माल विक्रीला यावा या दृष्टीने विजयकुमार आणि त्यांचे बंधु राजकुमार यांनी नियोजन केले होते. सर्वकाही वेळेत होत गेले आणि आता कलिंगडला मागणीही चांगली आहे. त्यामुळे 42 टनापैकी 34 टन कलिंगडाची विक्री ही बांधावर झाली आहे. कलिंगडचा चांगला दर्जा असल्यामुळे व्यापाऱ्यांनी 14 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली आहे. यामधून राखुंडे बंधु यांना 5 लाख 40 हजाराचे उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय 1 लाख खर्च वजा होता 4 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.
कलिंगड हे हंगामी पीक असले तरी कोणत्या वेळेत दर मिळतील याचे गणित महत्वाचे आहे. काही शेतकरी हे उन्हाळ्याच्या तोंडावर विक्री करता येईल याचा विचार करतात. तर काहीजण हे रमजान महिन्यात अधिकची मागणी असते त्याप्रमाणे लागवड करतात. मात्र, या दोन महिन्याच्या योग्य नियोजनावरच दर आणि सर्वकाही ठरते. राखुंडे यांनी एका एकरात शुगर क्विन वाणाची लागवड केली होती. दोन्ही रोपांमध्ये 6 फुटाचे अंतर सोडून सरी पध्दतीने लागवड केली तर सबंध शेत जमिनीवर मल्चिंगचे अच्छादन होते. यामुळे तणही वाढले नाही पाण्याचे बाष्पीभवनही प्रतिबंधित होते. पाण्याचे बचत आणि त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे म्हणून ठिबकच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्यात आला होता. क्षेत्र कमी असले तरी योग्य नियोजनामुळेच हे शक्य झाले आहे.
चांगल्या दर्जाच्या शेतामालाला किंमत ही मिळतेच. त्याच प्रमाणे राखुंडे यांनी निवडलेल्या शुगर क्विन या वाणाच्या कलिंगडाची चव काही औरच आहे. त्यामुळेच व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. शिवाय तीन महिन्यापूर्वीच उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारपेठेचे चित्र काय राहिल याचा अंदाज घेऊन केलेली लागवड आज फायद्याची ठरलेली आहे. त्यामुळे 2 महिन्यात चार लाखाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे.
Crop Insurance : खरिपापूर्वीच पीकविमा योजनेचा निर्णय, केंद्राबरोबर की राज्याची स्वतंत्र यंत्रणा..!
Photo Gallery : अतिरिक्त ऊस कारखान्यावर नव्हे तर फडातच आगीच्या भक्षस्थानी, काय आहेत कारणे?