गणेश सोळंकी, बुलढाणा : मागच्यावर्षी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई पिकविमा कंपनीने (Crop Insurance Company) द्यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (buldhana Malkapur) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर तशा पद्धतीचे निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याकडे शेतकऱ्यांनी (Farmer) दिले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा संरक्षण योजना काढली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पिकविमा प्रीमियम भरून काढला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मलकापूर तालुक्यातील काही शिवारांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी रितसर पिकविमा कंपनीकडे तक्रार अर्ज करून देखील त्या पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंज्या प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली. ही रक्कम अतिशय तोकडी असल्यामुळे शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम सुद्धा शेतकऱ्यांना परत मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मागच्या आठदिवसात महाराष्ट्रात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. आता सरकार कधी शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काल रात्री नंदुरबार, नवापूर तळोदा आणि शहादा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसा सह गारपीट झाल्याने काढण्यासाठी आलेला हरभरा, गहू, मका, ज्वारी, झाला आहे तर फळबागातील टरबूज, खरबूज, केळी, पपई आणि मिरची पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसोबतच नंदुरबार मधील मिरची व्यापाऱ्यांनाही आवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे नंदुरबार बाजार समिती मध्ये खरेदी केलेली मिरची अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.