नंदूरबार : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम (Kharif Season) खरीप आणि आता रब्बी हंगामावरही झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली असून आता शेतीकामे कशी करावीत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र, यंदा (Maharashtra) राज्यातील शेतकऱ्यांना (Crop Loan) पीक कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पीक कर्जाला सुरवात झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या ही प्रक्रिया सूरु झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी १ हजार २३७ कोटी ८३ लाख रुपयांचा कर्ज वाटपाचा लक्षांक जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. राष्ट्रीयकृत, खासगी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जाणार आहे.
निसर्गाचा लहरीपणा त्यामध्येच बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शिवाय आता खरीपपुर्व मशागतीची आणि पेरणीची कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारने धोरणांमध्येच बदल केला आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या योजनांची लागलीच अंमलबजावणी ही करावी लागणार आहे. एप्रिल महिन्यापासूनच पीक कर्ज वाटपाला सुरवात करावी आणि 30 जूनपर्यंत प्रत्येख शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा असे नियोजन करण्याचे आदेश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील नवीन नमुन्यातील शेतकरी खातेदारांना शंभर टक्के सातबारा घरपोच करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही शेतकरी कर्ज वाटप लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशिक्षण घेत आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामापूर्वी कर्ज वाटप करण्याच्या अंदाज पालकमंत्री के सी पाडवी यांनी केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी या कर्जाचा उपयोगही शेती कामासाठीच केला तरच त्याचा फायदा होणार आहे.
पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे. 31 जूनपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सरकारचे धोरण आहे. खरीपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ही प्रक्रिया सुरु झाली तर बॅंकांना त्यांचे उद्दीष्ट साधता येणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे.