लातूर : खरीप हंगाम तर अतिवृष्टी, गारपिट आणि वातावरणातील बदलामध्येच गेला होता. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊनही उत्पादनात मोठी घट झाली होती. सोयाबीन हे (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्याचे हुकमाचे पीक होते पण अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका याच पिकाला बसलेला होता. मात्र, खरिपात झालेल्या अधिकच्या पावसाचा फायदा (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांना होईल असा आशावाद होता. मात्र, जे खरिपात झाले त्याचीच पुन्नरावृत्ती रब्बीत होते की काय अशीच अवस्था हंगामाच्या सुरवातीला झाली होती. पेरणी होताच अवकाळी आणि हे कमी म्हणून की काय पुन्हा गारपिटीची भर. यानंतरही आता रब्बी हंगामातील पिके मोठ्या जोमात बहरत आहेत. शिवाय यंदा शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पध्दतीमधील बदलाने (Production Increase) उत्पादन वाढीची अपेक्षा कायम आहे. मध्यंतरी निसर्गाच्या अवृपेमुळे सर्वकाही संपले अशीच परस्थिती झाली होती पण वातावरण निवाळल्याने शेतकऱ्यांच्या उंचावल्या आहेत.
रब्बी हंगामातील पेरण्या होऊन आता दोन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. आतापर्यंत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी पुन्हा थंडीत झालेली वाढ ही पिकांसाठी धोकादायकच होती. गेल्या 15 दिवसांपासून थंडीही कमी झाली आहे. त्यामुळे पीक वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे मूबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने सिंचनाचा विषय मिटलेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, उन्हाळी सोयाबीन, मोहरी, ज्वारी ही पिके बहरत आहेत. हरभऱ्याचा अधिक पेरा झाला असून घाटे लागवडीच्या अवस्थेत पीक आहे. तर ज्वारीलाही कणसे लागली असून असेच निरभ्र वातावरण राहिले तर खरिपात झालेले नुकसान भरुन निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
बदलत्या वातावरणामुळे आणि लांबलेल्या पेरण्या यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा अधिक पेरा केल्यास उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला होता. एवढेच नाही तर क्षेत्र वाढावे यासाठी अनुदानवर हरभरा बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामुळेच हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणामुळे कीड-अळीचा प्रादुर्भाव वाढला होता पण आता वातावरण निवळले असून औषध फवारणी आणि मशागतीची कामे आटोपल्याने शेत शिवारात पिके बहरत आहेत कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन आणि वाटप केलेले बियाणे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळही कमी बसलेली आहे. आता उत्पादन वाढीची अपेक्षा आहे.
आता वातावरण निवळल्याने शेतीकामे करण्यास शेतकऱ्यांकडे वेळ आहे. शिवाय यंदा मूबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. आता रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत शिवाय कीड-रोगराईचा प्रादुर्भाव नसल्यामुळे उत्पादनात वाढ करण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. तर पहिल्या पेऱ्यातील हरभऱ्याची काढणी केली तरी हे पीक सुरक्षित राहणार असल्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.
एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर ‘नवा’ पर्याय
Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?