नंदूरबार: ऊसाचे पाचट (Cane bagasse) जाळणे हे केव्हाही धोक्याचेच. शेतकरी शक्यतो पाचट हे पेटवून खोडवा ऊसाची तयारी करतो. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. मात्र, असे न करता पाचट जाळताना नवापूर शहरातील लकी पार्क शेजारील भागात 12 एकरातील (Sugarcane Fire) ऊस आगीत जळून खाक झाला आहे.या दुर्घटनेत धर्मेश पाटील या 12 लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागताच (Farmer) शेतकऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला मात्र ऊन आणि वाऱ्यामुळे अवघ्या काही वेळेत आगीने रौद्ररुप धारण केले आणि अवघ्या दोन तासांमध्ये 12 एकराच्या फडाचे नुकसान झाले. मात्र, शहरालगतच ही घटना झाल्याने लागलीच विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेळेत ऊसाचे गाळप झाले असते तर ह्या दुर्घटना टळल्या असत्या.
एका फडात ऊसतोडणी सुरु तर दुसरीकडे आगीच्या भक्क्षस्थानी 12 एकरातील ऊस असेच काहीसे चित्र धर्मेश पाटील यांच्या शेतामध्ये होते.एकतर ऊसतोड वेळेत न आल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. शिवाय अनेक वेळा मनधरणी केल्याने आता कुठे ऊसतोडीला प्रारंभ झाला होता. मात्र, लगतच्या शेतामध्ये पाचट हे पेटवून देण्यात आले होते. वाऱ्यामुळे ही आग पसरली आणि पाटलांचा 12 एकरातील ऊस जळून खाक झाला.
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कष्ट करून उभा केलेला ऊस जळताना पाहून शेतकरी हताश झाले. ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूज काढून वीजप्रवाह बंद केला. आग विझवण्यासाठी नगरसेवक आरिफ बलेसरीया, माजी नगरसेवक दर्शन पाटील, अल्पेश पाटील, दिपेश पाटील, संदिप पाटील, धर्मेद्र पाटील आदींनी घटनास्थळी मदत केली. तर घटनास्थळी डोकारे साखर कारखान्याचे मुख्य शेतकरी अधिकारी शिवाजीराव देसाई, सर्जेराव गांगुर्डे, अजय गावीत, नियोजन करीत तोडणीसाठी जादा तूकडी लावून कारखान्यात तात्काळ उस घेण्यात येईल असल्याची माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. ऊसतोड ऱखडल्याने ऊसाच्या वजनात घट तर होणारच आहे पण कारखान्याच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा ऊसाचे गाळप होते की नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. मध्यंतरी पावसामुळे ऊस पाण्यात होता तर आता वेळेत तोड होत नसल्याने वजनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.
Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले
Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन
Drone Farming : शेत शिवारात पोहचलं ड्रोन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण अन् काय आहे जिल्हा परिषदेचे धोरण?