अमरावती : अनिश्चित व अनियमित असलेल्या (Heavy Rain) पावसाने शहरात शनिवारी दुपारी अशी काय तुफान बॅंटिगं केली की सर्वकाही पाण्यात अशीच अवस्था झाली होती. यामध्येही खऱ्या अर्थाने शिकारी ठरला तो शेतकरी. नेहमीप्रमाणे येथील (Amravati Market) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासूनच शेतीमाल दाखल होण्यास सुरवात झाली होती. मात्र, सौदे होण्यापूर्वीच पावसाने अशी काय हजेरी लावली की यामध्ये शेतीमालाचे पुरचे मात्रे झाले. अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनाही काही करता आले नाही. शेतकऱ्यांच्या मालाबरोबर व्यापाऱ्यांनीही साठवलेला (Loss of agricultural goods) माल पाण्यात अशी अवस्था झाली आहे. पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे मात्र, रखडलेल्या पेरणी कामाला वेग येईल अशी आशा आहे.
सध्या शेत शिवारात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून पेरण्याच्या खर्चासाठी शेतीमालाची आवक वाढली आहे. बाजारपेठेत हरभरा, सोयाबीन आणि तुरीची आवक सुरु आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आवक मोठ्या प्रमाणात झाली असतानाच पावासाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या सुरक्षतेसाठी धडपड केली मात्र, 15 मिनिट बरसलेल्या या पावसाने सर्वत्र पाणी-पाणी केले होते. पोत्यांसह परिसरात साठवलेल्या मालात पाणी साचले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नुकसानीचाच ठरला.
जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात होते. असे असताना देखील शेतीमाल सुरक्षित ठेवण्यापूरतीही सुरक्षित जागा बाजार समिती परिसरात नाही. ज्याप्रमाणे पीक वावरामध्ये उघड्यावर तीच अवस्था बाजार समितीमध्येही अशी स्थिती आहे. व्यापाऱ्यांकडे साठवणुकीसाठी गोदाम आहेत पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाची कोणतीही दखल बाजार समिती प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही.
दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. याबाबत हवामान विभागानेच स्पष्टता दिली आहे. शिवाय 17 जूनपासून 5 दिवस हे पावसाचेच राहणार असल्याचा अंदाजही आहे. असे असाताना अमरावती शहारसह परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस खरीप पिकांसाठी उपयोगी ठरणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या रखडल्या होत्या.