यंदाचे वर्षा हे महिला शेतकरी सन्मान वर्ष असल्याची घोषणा ठाकरे सरकारने यापूर्वीच केली आहे. याचा पुन्ररउल्लेख कालच्या अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे. मात्र, सन्मान तर सोडाच पण बांधावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्याच्या कष्टाची कदर झाली तरी मिळवले असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण निसर्गाशी दोन हात करुनही पदरी नुकसान पडल्याने निफाड तालुक्यातील खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्ष बाग मोडून शार्क वन जातीची मिरची ची लागवड केली आहे.
उत्पादन वाढीसाठी शेतकरी महिलेने पीक पध्दतीमध्ये बदल केला मात्र, विद्युत पुरवठा खंडीत केल्याने समस्या कायम आहे.
Follow us on
लासलगाव : यंदाचे वर्षा हे महिला शेतकरी सन्मान वर्ष असल्याची घोषणा (State Government) ठाकरे सरकारने यापूर्वीच केली आहे. याचा पुनरउल्लेख कालच्या अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे. मात्र, सन्मान तर सोडाच पण बांधावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्याच्या कष्टाची कदर झाली तरी मिळवले असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण निसर्गाशी दोन हात करुनही पदरी नुकसान पडल्याने निफाड तालुक्यातील खानगाव येथील (Women Farmer) महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्ष बाग मोडून शार्क वन जातीची मिरची ची लागवड केली आहे. पोषक वातावरण आणि अथक परीश्रमाच्या जोरावर मिरची बहरलीही मात्र, आता ऐन महत्वाच्या प्रसंगी (MSEB) महावितरणने वाढीव वीजबिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वाढते ऊन आणि गरजेच्या प्रसंगीच महावितरणने केलेली कारवाई याचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. सध्या किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये किलोचा दर असताना केवळ महावितरणच्या कारवाईमुळे उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. शिवाय पैसे पदरी पडताच थकबाकी अदा केली जाईल असे आश्वासनही रोहिणी शिंदे यांनी दिले आहे. मात्र, कारवाई अटळ असल्याचे सांगत कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाची कदर होणे गरजेचे आहे.
महिला शेतकरी असलेल्या शिंदेची अशी ही कहाणी
कोरोना प्रादुर्भावामुळे द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना गेली दोन वर्ष आपली द्राक्ष 5 ते 10 रुपये किलोप्रमाणे इतक्या मातीमोल बाजार भावाने विकण्याची वेळ आली होती यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याने घेतलेले कर्ज फेडावे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न उभा राहिल्याने निफाड तालुक्यातील खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्षाच्या पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीत वेगळा प्रयोग केला. या क्षेत्रावर त्यांनी शार्क वन जातीची मिरची लागवड केली आहे. बाजारात भावही चांगला आहे शिवाय मागणीही अधिक असताना केवळ वेळेत पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादनात घट होत आहे. परस्थितीशी दोन हात करुन त्यांनी हा प्रयोग केला आहे. मात्र, महिला शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष असल्याची घोषणा करणाऱ्या सरकारने चित्रही पाहणे गरजेचे आहे.
पीक पध्दतीमध्ये बदल करुनही पदरी निराशाच
निफाड तालुक्यातील खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्षाच्या पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीत वेगळा प्रयोग केला. दोन एकरावरील द्राक्ष बाग तोडून 2 ते 3 लाख रुपये खर्च करून शार्क वन जातीची मिरची ची लागवड केली. मिरचीचे उत्पादनही चांगले आले ठोक बाजारात आज मिरचीला 80 ते 100 रुपये किलोला बाजार भावही मिळत आहे. मात्र, अस्मानी संकटानंतर महावितरणचे सुल्तानी संकट उभे राहिले आहे. कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठाच खंडीत करण्याची मोहीम सुरु आहे.अनेक ठिकाणी कृषीपंपाचे कनेक्शन तोडले जात आहे तर रोहित्र बंद केले जात असल्याने मिरचीच्या पिकाला पाणी द्यायचे कुठून हा प्रश्न रोहिणी शिंदे यांच्या समोर आहे.
तर थकीत वीजबिलही अदा केले जाईल
वाढत्या थकबाकीमुळे खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी शिंदे यांचा विद्युत पुरवठा हा खंडीत करण्यात आला आहे. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत झाला तर उत्पादनात भर पडेल आणि याच मिरची उत्पन्नातून महावितरणची थकबाकी अदा केली जाईल पण त्याकरिता अगोदर विद्युत पुरवठा सुरळीत होण गरजेचे असल्याचे मत रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. आता महावितरण काय पावले उचलणार हे पहावे लागणार आहे.