चंद्रपूर : राज्यात सध्या (Monsoon rain) पावसाने उघडीप दिली असली तरी शेती पिकांचे नुकसान हे सुरुच आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसात सातत्य राहिले होते. त्यामुळे (Kharif Season) खरीप हातचा जाणार अशीच स्थिती होती. पण गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामाला वेग आला आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वेगळीच स्थिती आहे. (Dam Water) धरणातील पाण्याची आवक वाढल्याने येथील पाणी ब्रह्मपुरीमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीच्या पुराचे पाणी थेट शेतशिवारात घुसले होते. पावसाने उघडीप दिली तरी धरणातील पाणीसाठा होणारे नुकसान हे टळलेले नाही. पावसाच्या उघडीपीनंतर शेतीकामे जोमात होतील असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण उरली-सुरली आशाही मावळली आहे. नदीकाठच्या शिवारात पाणीच-पाणी अशी स्थिती आहे.
ब्रह्मपुरी नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाहीतर शेत जमिनही खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्याशिवाय त्यांच्या उदरनिर्वाह देखील होणार नाही अशी भीषण स्थिती ओढावली आहे. नुकसानीची दाहकता पाहता आ. विजय वडेट्टीवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले होते. त्यांनी पिकांची तर पाहणी केलीच पण सोमवारी या नुकसानीबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले आहे.
राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी, गोसीखुर्द धरण क्षेत्रात 15 आणि 16 ऑगस्ट रोजी अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. परिणामी नदीला पूर येऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत अन् खर्चही वाया गेला आहे. आता पाऊस नाही पडला तरी नुकान हे ठरलेलेच आहे. शेतातील धानपीक, सोयाबीन, तुर व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
नुकसानभरपाईच्या रकमेसाठी पंचनामे हे गरजेचे आहेत. शिवाय राज्यात या प्रक्रियेला सुरवात झाली होती. असे असतानाच आ. वडेट्टीवार यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली. शिवाय शेतकऱ्यांशी संवादही साधला. पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या भागातील पीक नुकसानीचे आणि शेत जमिनीचे पंचनामे झाले तरच शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळणार आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.