अमरावती : निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा अनुभव सध्या (Maharashtra) राज्यात पाहवयास मिळत आहे. अवकाळी (Rain) पावसामुळे कोकणात आंब्यासह इतर (Fruit crops) फळपिकांचे नुकसान होत आहे तर याच्या उलट स्थिती विदर्भात आहे. विदर्भामध्ये वाढत्या उन्हाच्या झळामध्ये मोसंबी बागा ह्या होरपळून निघत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. कधी पावसामुळे तर कधी वाढत्या ऊन्हामुळे सध्या तर ऊन-पावसाचा खेळच राज्यात पाहवयास मिळत आहे. अजून तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात अवकाळीच्या सरी बरसणारच आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा पारा हा वाढणारच असल्याचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याने उष्मघाताचा धोका तर वाढला आहेच पण मोसंबी, संत्र्याच्या बागा होपरपळू लागल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
सध्याचा पाऊस आणि वाढते ऊन हे दोन्हीही नुकसानीचेच ठरत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मोसंबी आणि संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्याच्या कडाक्याच्या ऊन्हामध्ये बागांवर तर परिणाम झालाच आहे पण मोसंबी आणि संत्री ही फळे देखील होरपळत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चितच मानली जात असून वाढत्या तापमानामुळे फळ पिकांत वाढ खुंटणे, फळगळ होणे, फळे काळी पडणे यासह छोटी फळे काळवंडत आहेत. मोसंबी झाडांची नाजूक पाने करपून जात आहेत.
मराठवाड्यात देखील दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पण पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळलेले आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी सुरु असून अनेकांची मळणी कामे बाकी आहेत. अशातच पावसाने हजेरी लावली तर मात्र, थेट शेतीमालावरच परिणाम होणार होता. पावसामुळे काढलेली ज्वारी ही काळवंडते तर अपेक्षित दरही मिळत नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी निवाऱ्याला ज्वारीसह इतर पिकांची साठवणूक केली आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न केले मात्र, निसर्गाचा लहरीपणाचा कायम अडथळा झाला आहे. यंदा मोसंबी आणि संत्रा फळांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. शिवाय बागा आता अंतिम टप्प्यात असतानाच वाढत्या उन्हामुळे फळांचे तर नुकसान होतेच पण उशिरा आलेला बहराचे देठ नाजूक असल्याने त्याचीही गळती होती. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Unseasonal Rain : उरली-सुरली आशाही मावळली, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा राहिली
Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा