Ratnagiri : फळांचा ‘राजा’स्थानकावरच मुक्कामी, नुकसान भरपाईसाठी बागायतदाराची थेट ग्राहक न्यायालयात धाव..!

| Updated on: May 01, 2022 | 4:37 PM

हापूस आंबा योग्य वेळी ग्राहकांना मिळावा या हेतूने समिर यांनी तो रेल्वेद्वारे नवी दिल्ली येथे पोहचवण्याचे नियोजन केले होते. पण रेल्वे प्रशासनाला याचे गांभिर्य काय? असा सवाल उपस्थित होईल असाच कारभार रेल्वे प्रशासनाने केला आहे. तब्बल तीन दिवस हापूस आंबा रेल्वे स्थानकातच पडून होता.

Ratnagiri : फळांचा राजास्थानकावरच मुक्कामी, नुकसान भरपाईसाठी बागायतदाराची थेट ग्राहक न्यायालयात धाव..!
रत्नागिरी रेल्वे स्थानकातच हापूस आंबा ठेवला गेल्याने दर्जावर परिणाम झाला.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रत्नागिरी : फळांचा राजा असलेल्या (Hapus Mango) हापूसची यंदाच्या हंगामात चांगलीच परवड झाली आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले होते तर तोडणीच्या दरम्यान वाढत्या उन्हामुळे तडे गेले होते. अडथळ्यांची शर्यत पार करीत हापूस (Mango) आंबा आता दिल्लीवारी करणार येथेही त्याला अडचणींचाच सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अस्मानी संकटे ओढावली होती आता सुल्तानी संकट निर्माण झाले आहे. रत्नागिरीतून रेल्वेने दिल्लीत हापूस पाठवायचा होता. पण (Railway Department) रेल्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा आंबा रेल्वेस्थानकातच आहे. त्यामुळे आंब्याचे नुकसान झाले असून 15 दिवसांमध्ये नुकसानभरपाई न मिळाल्यास ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला जाणार आहे.

नेमकी रेल्वे प्रशासनाची अडचण काय?

यंदाच्या हंगामात समीर दामले यांनी आतापर्यंत दोन वेळा आंबे नवी दिल्लीला रेल्वेमधून पाठवलेही; परंतु गुरुवारी 374 किलो आंबे लाकडी पेटीमधून दिल्लीला पाठवण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्थानकात पाठवले होते. पहिल्या दिवशी हजरत निजामुद्दीन गाडीत जागा नसल्याचे कारण देण्यात आले असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शुक्रवारी राजधानी एक्स्प्रेसमध्ये अचानक दक्षिणेकडील रेल्वेस्थानकातून मालगाडीत मटण भरण्यात आले होते. परिणामी रत्नागिरीतून आंबे पाठवण्यासाठी जागाच मिळालेली नाही. शनिवारीही उडवाउडवीची कारणेचे समीर दामले यांना सांगण्यात आली. सलग तिन दिवस आंबे जागेवरच राहिल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता आहे.

हापूस खराब होण्याचा धोका

हापूस आंबा योग्य वेळी ग्राहकांना मिळावा या हेतूने समिर यांनी तो रेल्वेद्वारे नवी दिल्ली येथे पोहचवण्याचे नियोजन केले होते. पण रेल्वे प्रशासनाला याचे गांभिर्य काय? असा सवाल उपस्थित होईल असाच कारभार रेल्वे प्रशासनाने केला आहे. तब्बल तीन दिवस हापूस आंबा रेल्वे स्थानकातच पडून होता. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर तर परिणाम झालाच आहे पण ग्राहकांनी त्याची खरेदी केली नाही तर नुकसानीला जबाबदार हे रल्वे प्रशासनच राहणार असल्याचा दावा समिर दामले यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

उन्हामुळे आंबा खराब होण्याचा धोका

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. अधिकच्या उन्हामुळे आंबा डागाळतो. शिवाय हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे आंब्याचे नुकसान झाले होते. आता पुन्हा रेल्वे प्रशासनाच्या या कारभारामुळे आंबा उत्पादकांना धोका निर्माण झाला आहे. हापसूला भौगोलिक मानांकन मिळाले असून योग्य दर्जाचा आंबा असेल तरच त्याची विक्री होते. मात्र वाढलेल्या उन्हामुळे आंब्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे.