सांगली : गेल्या चार महिन्यांमध्ये (Unseasonal Rain) अवकाळी आणि सततच्या पावसाचा सामना करीत हंगाम पार पडला पण अवकाळीचे संकट काही टळलेले नाही. अवकाळीमुळे उत्पादनात तर घट झालीच पण (Grape Quality) द्राक्षाचा दर्जाही ढासळलेला आहे. हे कमी म्हणून की काय आता वादळी वाऱ्यामुळे जत तालुक्यातील बिळूर येथील दीड एकर (Vineyard) द्राक्ष बाग आडवी झाली आहे. अवकाळीमुळे यंदा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दर महिन्याला अवकाळी पाऊस हा ठरलेलाच आहे. द्राक्षाचे नुकासान झाले म्हणून शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीवर भर दिला मात्र, यासाठी उभारलेले शेडही वाऱ्यामुळे उध्वस्त होत आहे. त्यामुळे यंदा तेलही गेले अन् तूपही अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
अधिकचा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे बिळूर येथील शेतकरी भैरापा हुचापा करेणावर आणि सिद्राया हुचापा करेणावर यांच्या दीड एकर सामाईक द्राक्ष बाग जोपासली होती. होणारा खर्च आणि उत्पादन हे निम्याने घेण्याचे ठरले मात्र, अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे दुप्पट खर्च झाला पण पदरी उत्पादन पडले नाही. या दोन शेतकऱ्यांचे तब्बल 24 लाखाचे नुकसान झाले आहे. अगोदरच उत्पादनात घट झाली होती. यातून सावरण्यासाठी शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत पण यासाठी आवश्यक असलेले शेड देखील वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त होत आहेत.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ असेच चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भात उन्हामध्ये वाढ होत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तर गेल्या दोन दिवसापासून अवकाळीच्या सरी बरसत आहेत. मंगळवारी जत तालुक्यातील बिळूर येथील शिवारातील द्राक्षबागा तर जमिनदोस्तच झाल्या पण या वादळी वाऱ्यामुळे इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. हंगामाच्या सुरवातीला म्हणजे नोव्हेंबरपासून हंगामाला आणि अवकाळी पावसाला सुरवात झाली होती. आता द्राक्ष काढणी झाली आहे पण अवकाळी कायम आहे.
यंदा द्राक्षाचा दर्जा ढासळलेला आहे शिवाय बाजारपेठेत मागणीही घटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता बेदाणा निर्मितीवर भर देत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये बेदाणा निर्मितीसाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे. शिवाय यासाठी कोरडे वातावरण असणे गरजेचे आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे बेदाणा निर्मितीला अडचणी येत आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने यासाठी उभारण्यात आलेले शेडही उध्वस्त केले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे संकट हे कायम आहे.
Success Story: कोरडवाहू जमिनीवर सफरचंदचा गोडवा, आधुनिकतेची कास धरत ठाकरे शेतकऱ्यानं साधली ‘ही’ किमया
Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं
Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!