Seed Festival : वाह रे बहाद्दर..! उत्पादक शेतकरी अन् खरेदीदारही शेतकरीच, राज्याने अनुकरण करावे असा हा ‘अकोला पॅटर्न’

| Updated on: Jun 07, 2022 | 1:12 PM

सध्या बाजारपेठेत एक ना अनेक प्रकारचे बियाणे विशेषत: सोयाबीनचे दाखल झाल आहे. अधिकच्या दरातून शेतकऱ्यांची लूट केली जाते. शेतकऱ्यांनीच बियाणांची निर्मिती करुन या कंपन्यांचा बाजार उठवणे गरजेचे आहे. यंदा प्रथमच बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. असे असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या महोत्सवात 10 हजार 173 हजार क्विंटल बियाण्याची खरेदी व विक्री होऊन तब्बल 29 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

Seed Festival : वाह रे बहाद्दर..! उत्पादक शेतकरी अन् खरेदीदारही शेतकरीच, राज्याने अनुकरण करावे असा हा अकोला पॅटर्न
अकोला येथील बियाणे महोत्सावात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. शेतकऱ्यांच्या बियाणांना अधिकची मागणी होती.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अकोला :  (Kharif Season) खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी (Agricultural Department) कृषी विभागाकडून एक ना अनेक उपाय राबवले जात आहेत. अकोला कृषी विभागाच्या माध्यमातून (Seed Festival) बियाणे महोत्सावाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांनीच तयार केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनी खरेदी केली. महोत्सवामुळे बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली तर इतर शेतकऱ्यांची बियाणांची गरज पूर्ण झाली. 6 दिवसाच्या या महोत्सावात 10 हजार 173 क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.ऐन खरिपाच्या तोंडावर महोत्सावाचे आयोजन करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. महोत्सवाचे उद्धघाटन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये झाले होते. या अनोख्या उपक्रमामुळे बियाणे निर्मितीची स्पर्धा झाल्यास अधिकच्या किंमतीचे बाजारपेठेतील बियाणे खरेदी करावेच लागणार नाही असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

कंपन्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बियाणांना मागणी

सध्या बाजारपेठेत एक ना अनेक प्रकारचे बियाणे विशेषत: सोयाबीनचे दाखल झाल आहे. अधिकच्या दरातून शेतकऱ्यांची लूट केली जाते. शेतकऱ्यांनीच बियाणांची निर्मिती करुन या कंपन्यांचा बाजार उठवणे गरजेचे आहे. यंदा प्रथमच बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. असे असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या महोत्सवात 10 हजार 173 हजार क्विंटल बियाण्याची खरेदी व विक्री होऊन तब्बल 29 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यामध्ये सोयाबीनच्या बियाणांची सर्वाधिक विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बियाणे उत्पादक कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बियाणांना अधिकची मागणी होती. दरवर्षी वेगवेगळी कारणे सांगून कंपन्या बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ करतात. त्यामुळे हा सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यासमोर उभा राहत आहे.

सोयाबीनच्या माध्यमातून सर्वाधिक उलाढाल

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 ते 6 जून या दरम्यान बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत 10 हजार 173 हजार क्विंटल बियाण्याची खरेदी व विक्री झाली आहे. या महोत्सवाच्या काळात 29 कोटींची उलाढाल झाली असून यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. उत्पादकांना अपेक्षित दर आणि खरेदीदारांना बाजारपेठेपेक्षा कमीने बियाणे असा मधला मार्ग या महोत्सावाच्या माध्यमातून समोर आला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या बियाणांना नाही पण शेतकऱ्यांच्या बियाणांना अधिकची मागणी होती.

हे सुद्धा वाचा

उत्पादकांना मार्केट अन् उत्पादनातही वाढ

कृषी विभागाच्या या अनोख्या उपक्रमामुळे ज्या शेतकऱ्यांनी बियाणांची तयार केले आहेत त्यांनाही स्थानिक पातळी मार्केट मिळाले. तर दुसरीकडे बियाणे घेणाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये बियाणे उपलब्ध झाले. गेल्या 6 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील या महोत्सावाच्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होती. ऐन हंगामाच्या तोंडावरच या महोत्सवाचे आयोजन झाल्याने कृषी विभागाने दुहेरी उद्देश साध्य करुन घेतला आहे.