धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Dhule Agricultural Produce Market Committee)शेतकऱ्यांच्या (Farmer) बैलांना अर्ध्या किमतीत विकण्याची वेळ आली आहे. घरात असलेली बैलजोडी कमी भावामुळे विकता येत नाही. तर लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज असल्याने बैल जोडी विकावी लागते आहे. लम्पी (Lumpy skin disease) या आजारामुळे जनावरांच्या किमती सु्द्धा कमी झाल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी चिंताग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. लम्पी आजार आल्यापासून सगळ्याचं जनावरांच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे शेतकरी सुध्दा हतबल झाले आहेत.
शेतकऱ्यांना लम्पी आजाराच्या बंद नंतर बैलांची जोडी अर्ध्या किमतीत विकायची वेळ आली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलांच्या किमती कमी झाल्या आहेत. व्यापारी हे सुमारे दीड लाख रुपयाची बैलाची जोडी अर्ध्या किमतीत मागत आहेत, बैलाला भाव नाही. लम्पी आजाराच्या बाजार बंद नंतर ही परिस्थिती उद्भभली आहे. पैसे हवे असल्याने अवघ्या 80 हजार रुपयात ही जोडी विकावी लागत आहे. सर्वच बैलांच्या किमती या विकताना कमी किंमतमध्ये विकावे लागल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो आहे.
लम्पी आजार उद्धभल्यापासून अनेक जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. त्याचबरोबर जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यातं आलं होतं. ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे, त्यांच्या उपचारासाठी राज्य सरकारने विविध सेंटर सुध्दा तयार केली होती.