धुळे : धुळे (Dhule) तालुक्यातील शरद भगवान पाटील (Sharad bhagwan patil) या शेतकऱ्याने यावर्षी पारंपारिक पिकांना छेद देत इतर पीक घेण्याचं ठरवलं. त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर टरबूज या पिकाची लागवड केली. ही लागवड तब्बल आपल्या चार एकर क्षेत्रात केली आहे. आता हे टरबूज (Watermelon) काढणीला आले आहे. यातून सुमारे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आहे. पारंपरिक शेती करत असताना या काळात गहू हरभरा मका या पिकाची लागवड न करता, दुसरे काही तरी कराव या हेतूने शरद पाटील यांनी पहिल्यांदा आपल्या शेतात टरबूज लावले.
शरद भगवान पाटील यांनी उत्तम निगराणी राखल्याने आता टरबुजाचे पीक चांगलेचं बहरले आहे. रमजान महिन्याच्या काळात व्यापारी हे टरबूज खरेदी करून घेऊन जाणार आहेत. सात ते आठ रुपये किलो दराने हे टरबूज विकले जाणार असून काही व्यापारी त्यासाठी शेतात येऊन गेले आहेत. या सर्वातून त्यांना 4 एकरात चार ते पाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचा पाटील यांनी सांगितलं.
सध्या अनेक शेतकरी पारंपारीक शेती न करता फायद्याची शेती करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. पारंपारीक शेती करीत असताना अनेकदा शेतकरी कर्जबाजारी होत असल्यामुळे बागायची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी इतर राज्यात ज्या पद्धतीनं पीक घेतलं जातं. त्याच पद्धतीने पीकं घ्यायला सुरुवात केली आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा सुद्धा झाला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करावी असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे.