धुळे : धुळे जिल्ह्यात (dhule) मागच्या काही दिवसात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु (maharashtra rain update) झाला आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाचं गारवा निर्माण झाला आहे. शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य शेतकरी खरेदी करीत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोगस बियाणे (bogus seeds) सापडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. खात्री केल्याशिवाय बिगाणे आणि खते घेऊ नये असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे. सध्या धुळे जिल्ह्यात पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
दोन दिवसांपासून थोडा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेती साहित्याची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. शेतीसाठी पासे, कुराड खुरपे, वीळा पावडे त्याचबरोबर आदी साहित्याची गरज लागत असते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असून येत्या काळात चांगला पाऊस होईल आणि शेतीकामांसाठी साहित्याची गरज लागणार असल्याने शेतकरी शेती साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी करू लागला आहे.
धुळे शहरात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे चांगलेचं वाढले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला तब्बल 100 रुपये किलोपर्यंत बाजारात मिळतोय, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. जून महिना संपला तरी, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धुळे शहरात भाजीपाल्याचे दर गग्नाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला हा आता तब्बल 100 रुपयांच्यावरती गेला आहे. तीस रुपये किलो भेटणारी कोथिंबीर 160 रुपये किलो, दहा रुपये किलो भेटणारे टमाटे 80 रुपये, गिलके 80 मिरची 100 रुपये,अद्रक 120, वांगी 80 किलो दराने मिळत आहे. सध्या शहरालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. मात्र पाऊस नसल्याने गावांमधील भाजीपाल्याची आवक घटली आहे.