हिंगोली: राज्यात हळदीचे सर्वाधिक उत्पादन हे (Hingoli District) हिंगोली जिल्ह्यामध्ये घेतले जाते. मात्र, हळदीचे क्षेत्र वाढण्यामागे तसे कारणही आहे. हळद लागवड करण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि परिसरात केळीची लागवड केली जात होती. परंतू, केळीवर वाढणारी रोगराई आणि घटते दर यामुळे शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्येच बदल करुन थेट (Turmeric cultivation) हळद लागवड करण्याचा निर्धार केला होता. शेतकऱ्यांनी केलेला बदलामुळे उत्पादन तर वाढले पण यामध्ये सातत्य राहिलेले नाही. वातावरणातील बदल हळदीवरही आता करपा आणि हुमणी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सध्या हळद हंगाम सुरु झाला असून दरही सरासरीप्रमाणे मिळत आहे. परंतू, वाढीव दर मिळूनही पदरी पडलेल्या उत्पादनातून याची कसर भरुन निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान तर झाले पण त्यानंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हळद पिकावर हुमणी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे. आगामी हंगामात हळद लागवडीसाठी बियाणे देखील मिळते की नाही अशी अवस्था आहे. बियाणांच्या किंमती वाढल्या असतानाही केवळ क्षेत्र पडीक राहू नये म्हणून शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली होती. पण लागवडीपासून निसर्गाचा लहरीपणा आणि अंतिम टप्प्यात हुमणी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता.
हळद हे काही मोजक्याच क्षेत्रात घेतले जाणारे पीक आहे. पण हळदीच्या गुणधर्मानुसार तिची वेगळी अशी ओळख आहे. हळदीची लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत 50 ते 60 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. बियाणे खरेदी, लागवड, खते, औषध फवारणी, मजुरी, काढणी आणि काढल्यानंतर पुन्हा शिजवून त्याची फिनिशिंग प्रक्रियेचा यामध्ये समावेश केला जातो. हा सर्व खर्च पाहता प्रति क्विंटल 8 ते 9 हजार रुपये दर मिळाला तरच हे पीक परवडते. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
आधी रेशीम कोष खरेदी आता कोष ड्रायर, जालना मराठवाड्यातील रेशीमचे मुख्य आगार
Change Environment : थंडी गायब, पारा चढला, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?
Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!