वाशिम : काळाच्या ओघात पुन्हा (Organic Farming) सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. खर्च कमी आणि अधिकेच उत्पादन यासाठी (Agricultural Department) कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. शिवाय केंद्र सरकारचाही भर हा सेंद्रीय शेतीवरच आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीय शेती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत (Agree University) कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी रिसोड तालुक्यातील नेतंसा, कंकरवाडी, अनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन केले शिवाय रब्बी हंगामातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांसमवेत वनभोजनाचा आस्वादही घेतला. त्यामुळे आता कुठे स्थानिक पातळीवरही सूचनांचे पालन करुन सेंद्रीय शेती क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने गव्हाचे उत्पादन घेतले आहे. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. केवळ शेणखतावर या पिकाची जोपासना केली आहे. तर दुसरीकडे नेतंसा येथील शेतकरी दीपक बाजड व गजानन बाजड यांनी केलेल्या सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केवळ अन्नधान्याचा दर्जाच सुधारतो असे नाही सेंद्रीय शेतीमध्ये खर्चही कमी होतो. शिवाय यासाठी जिल्हाभरात पोषक वातावरण असून शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनापेक्षा आहे ते उत्पादन चांगल्या दर्जाचे कसे घेता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले.
सेंद्रीय शेतीचा अवलंब कोणी करावा असे काही ठरवून दिलेले नाही. पण जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकरीच अधिक आहेत. शिवाय ही पध्दती अशाच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कारण कमी क्षेत्राची योग्य जोपासना ही सहज शक्य आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन अन् शेतीमालाला अधिकचा दर्जा यामधूनच शक्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी शेतातील पिकांची पाहणी करून बचतगट उभारलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच अवजार बँक व जलसंधारण कामाची देखील पाहणी केली. महाज्योतीअंतर्गत पेरणी केलेल्या करडई पिकाची तसेच सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या गहू पिकाची पाहणी केली.संत्रा व नवीन पद्धतीने लावलेल्या मोसंबी पिकाची देखील पाहणी करुन बदलत्या पीक पध्दतीबद्दल जाणून घेतले.जिल्हाधिकाऱ्यांनी गजानन बाजड यांच्या शेतात शेतकऱ्यांसोबत भाजी-भाकर जेवणाचा आस्वाद घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.
Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?