नंदुरबार : शासकीय नौकरदार असो की व्यवसायिक ज्याला शेतीची आवड आहे तो आपला छंद जोपासतोच. काळाच्या ओघात अनेकजण काळ्या मातीशी नाळ कायम ठेवतात. एवढेच नाही बदलत्या शेती पध्दतीनुसार (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन इतर शेतकऱ्यांसमोर वेगळेच उदाहरण समोर ठेवतात. असाच काहीसा अनोखा उपक्रम (Nandurbar District) जिल्ह्यातील वडाळी येथील पेशाने डॉक्टर असलेल्या नंदलाल चौधरी यांनी करुन दाखवला आहे. त्यांनी दोन एकरात शेड नेट मध्ये नॉनी सीड्स हनीड्यू आणि आलिया या दोन प्रकारच्या जातीच्या (Melon Farm) खरबूज ची लागवड केली होती.शेडनेट लागवड आणि कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या शिफारशींची त्यांनी अंमलबजावणी केली. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य प्रकारे जोपसणा झाल्याने आता खरबूजाला 30 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. यामुळे डॉक्टरांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी त्यापेक्षा जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.त्यामुळे अनेकजण या पध्दतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.
शेती व्यवसयात आता वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. पण यामध्ये सातत्य ठेवले जात नसल्याने शेतकऱ्यांना यश मिळत नाही. पण येथील डॉ. नंदलाल यांनी दोन एकरामध्ये शेडनेट उभारले आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यातच त्यांनी नॉनी सीड्स हनीड्यू आणि आलिया या दोन प्रकारच्या जातीच्या खरबूज ची लागवड केली होती. नेटशेडमुळे मशागतीचा खर्च नसला तरी उत्पादन वाढीसाठी त्यांनी कृषितज्ञांचे सल्ला घेतला शिवाय कंपनीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले.
खरबूज शेतीचा प्रयोग डॉक्टरांनी केला असला तरी याची चर्चा सबंध जिल्ह्यात आहे. अनेक शेतकरी हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत. तर अनेकांनी याची माहिती घेऊन अशाच पध्दतीने उत्पादन करण्याचा निर्धार केला आहे. डॉ. चौधरी यांचा देखील हाच उद्देश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांन्या आत्याधुनिक शेतीची माहिती होत नाही. त्यामुळे या प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरावा हीच यामागची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
खरबूजाचे अशा नवीन प्रकारचे उत्पादन जिल्ह्यात पहिल्यांदा घेतल जात आहे.यामुळे जिल्हाभरातून शेतकरी या ठिकाणी भेटी देत असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. तर नंदलाल चौधरी यांच्या शेतातील खरबूज एक्सपोर्ट केले जात आहेत. तसेच सुरत, मुंबई, अहमदाबाद मोठ्या शहरात व्यापारीविक्रीही पाठवतात. चौधरी यांना उत्पादन खर्च वजा जाता तीन लाखाचा फायदा झाला आहे. शेतकरी पूर्णवेळ देऊनही एवढे उत्पादन काढत नाही. त्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे.
बीडच्या शेतकऱ्यानं करुन दाखवलं, अधिकच्या फायद्यासाठी Market च ताब्यात घेतलं