नाशिक : संकटे आली की ती चोहीबाजूने येतात, शेतकऱ्यांवर तर गेल्या वर्षभरापासून संकटाची मालिकाच सुरु आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे व्यवस्थापन करावे तर बाजारात (Chemical fertilizer) रासायनिक खतांचे दर ( price rise) गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून आता खर्च केला तरी पुन्हा उत्पादनाचा भरवसा नाही. रासायनिक खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने रासायनिक खतांच्या किमती मध्ये गेल्या पंधरा वीस दिवसात दोनशे ते सातशे रुपये पर्यंत वाढ झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून शेतकऱ्यांना फावरणीची कामे करावी लागत आहेत.
– सुफला 15 15 15 मागिल महिन्यात 1350 या महिन्यात 1400
– महाधन 10 26 26 मागिल महिन्यात 1470 या महिन्यात 1640
– महाधन 12 32 16 मागिल महिन्यात 1480 या महिन्यात 1640
– महाधन 24 24 0 मागिल महिन्यात 1700 या महिन्यात 1900
– आयपीएल 16 16 16 मागिल महिन्यात 1370 या महिन्यात 1475
– पोटॅश मागिल महिन्यात 100 या महिन्यात 1780
गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी. यामुळे उत्पादनात तर घट होत आहे पण उत्पादनवाढीसाठी खर्च हा शेतकऱ्यांना करावाच लागतो. यंदा तर एकीकडे नुकसान आणि दुसरीकडे अधिकचा खर्च अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पुन्हा औषध फवारणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. यातच रासायनिक खताच्या दरात वाढ झाल्याने आता पिके जोपासायची कशी असा सवाल आहे. कृषिमंत्री दादा भुसे व केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार हे नाशिक जिल्ह्यातीलच असून शेतकऱ्यांच्या या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
गेल्या पंधरा वीस दिवसात रासायनिक खतांच्या किमतीत जी 200 रुपयांपासून ते 700 रुपयां पर्यत वाढ झाली असून या खतांना करिता लागणारे गॅस ,फॉस्फेट, सल्फ्यूरिक ॲसिड या कच्च्या मालाच्या किमती वाढ झाल्यामुळे खतांच्या देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन खताच्या किमती नियंत्रणात अंतिम का अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.