उस्मानाबाद : (Farm) शेती व्यवसयात तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आता आगामी काळात केला जाणार आहे. (Drone Farming) ड्रोन शेतीसाठी (Central Government) केंद्र सरकारनेच पुढाकार घेतला असून त्याचे परिणाम थेट शेत शिवारात पाहवयास मिळत आहे. शेतीमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीसह इतर कामासाठी उपयोग केला जाणार आहे. पण त्यापुर्वी शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच अनुशंगाने शुक्रवारी उस्मानाबाद तालुक्यात ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्राने निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात आता अंमलबजावणी होऊ लागली आहे.
ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना शेतकऱ्यांना केवळ मंजूर कीटकनाशकांचाच वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची उंची किती राहणार आणि प्रमाणदेखील निश्चित केले जाणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने हवेतून फवारणी करण्यापूर्वी संबंधित ऑपरेटरला 24 तास आगोदर तेथील स्थानिकांना याची माहिती द्यावी लागणार आहे. ड्रोन चालवण्यासाठी संबंधित व्यक्तीला योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही कृषी मंत्रालयाने सुचवलेले आहे. याशिवाय त्याला किटकनाशकाचे परिणाम काय होणार आहे त्याचीही माहिती असणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतात कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन देण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार आहे. केंद्राने घेतलेल्या निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होताना पाहवयास मिळत आहे.
उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रीकी महाविद्यालयाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद येथीलसेन्सकरी लॉब्सच्या मदतीने कमी खर्चीक व वेळेची बचत करणारे आधुनिक फवारणी ड्रोन आणले असुन त्याचे पळसवाडी शिवारात प्रात्याक्षिके घेण्यात आले.कॉलेजमधील ६० विद्यार्थांना प्रशिक्षण देऊन परिसरातील शेतकऱ्यांची पिक फवारणी करण्यात येणार आहे .अधुनिक कॉमेराद्वारे पिक पहाणी करून अवश्यक प्रमाणात औषध फवारणी होणार असल्याने शेतकऱ्यांची बचत होणार आहे .
Agricultural Pump : विद्युत पुरवठ्याचा कालावधी ठरला आता वीज तोडणी मोहीम बंद करण्यासाठी आंदोलन
Photo Gallery : नुकसानीची अवकाळी, काढणीला आलेली पीके भुईसपाट, रात्रीतूनच झालं होत्याचं नव्हतं..!
अवकाळाचे थैमान सुरुच राहणार, आता विदर्भ-मराठवाड्याला धोका, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?