जालना : राज्यात (Chickpea Crop) हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी (Shopping Center) खरेदी केंद्रावर नोंदणी केली मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी जो मेसेज पाठवला जातो ती प्रक्रियाच बंद आहे. खरेदी केंद्राकडे बारदाणाच शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीची प्रक्रियाच गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दरवर्षी (Farmer) शेतकऱ्यांचा माल सुरु झाली की ही समस्या समोर येतेच. मात्र, समस्यांपूर्वी उपाययोजना न करता आता किती दिवस खरेदी बंद राहणार या विवंचनेत शेतकरी आहे. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशीच काय ती अवस्था हमीभाव केंद्राची झाली आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आता खरेदी केंद्रावरच समस्या निर्माण होत आहेत.
जालना जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सुरवातीला नोंदणी आणि नंतर मालाचा दर्जा पाहून खरेदी ही प्रक्रिया आहे. येथील किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतच हरभरा विक्रीला प्राधान्य दिले होते. मात्र, बाजारपेठेपेक्षा 600 रुपये अधिकचा दर असल्याने आता कुठे नोंदणीला प्रतिसाद मिळत होता. गेल्या महिन्याभरात 6 हजार 328 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर केवळ 24 हजार 181 क्विंटल हरभऱ्याची खरेदी ही केंद्रावर झाली आहे.
राज्यात खरेदी केंद्र ही 1 मार्चपासून सुरु झाली आहेत. याच दरम्यान खरेदी केंद्रावर शेतीमाल साठवणूकीसाठी आवश्यक असलेला बारदाणा पोहचणे अपेक्षिक होते पण यासंबंधीचे टेंडर नाफेडने 21 मार्चला काढले आहे. त्यामुळे केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे तर सबंध राज्यात ही समस्या उद्भवली आहे. शिवाय मराठवाड्यतील खरेदी केंद्रावर बारदाणा हा कोलकाता येथून पुरविला जातो. त्यामुळे आता कुठे निविदाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अणखी काही दिवस तरी धिम्या गतीने हरभऱ्याची खरेदी होणार आहे.
हमीभाव केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास प्रथम शेतकऱ्यांना त्या पिकाचा पीकपेरा घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागते. यासाठी आधारकार्ड, बॅंक पासबुक, सातबारा, 8 अ अशी कागदपत्रे अर्जाला जोडून सादर करावी लागतात. यानंतर संबंधित खरेदी केंद्रावरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांनी माल केव्हा घेऊन यायचे यासंबंधी संदेश दिला जातो. त्यानंतर शेतीमालातील आर्द्रता तपासून खरेदी केली जाते तर खरेदी नंतर 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा नियम आहे. पण प्रत्यक्षात याला आवधी लागल असल्यानेच शेतकरी खुल्या बाजारपेठेकडे वळत आहे.
Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?
Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला