सांगली : द्राक्ष (grapes) आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या (farmer news in marathi) विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून थेट चड्डी मोर्चा काढण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी चड्डी घालून, निघालेल्या मोर्चामध्ये सहभाग झाले होते. सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी चड्डी मोर्चा काढला. राज्यातल्या द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कवडी मोलाचा भाव मिळत आहे. त्यामुळे प्रचंड नुकसानीला शेतकरी (sangli agricultural news) सामोरे जावे लागत आहे. द्राक्ष बेदाण्यापेक्षा चुरमुरेचे दर महाग आहेत अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन एक लाख रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर हा चड्डी मोर्चा काढण्यात येणारा होता. मात्र पोलिसांनी बंदी आदेश लावल्याने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा चड्डी मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आले. या पुढच्या काळामध्ये प्रसंगी नग्न मोर्चा काढू,असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
राज्यात अनेक रब्बी आणि खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला आहे. जे पीक पावसाच्या तडाख्यातून वाचले आहे, त्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग निराश झाला आहे. ज्या शेतीचं नुकसान झालं आहे. त्याची अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बागांचे, त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.