Agricultural University : काय सांगता? कापसाची तोडणी अन् बांधावरच होणार जिनिंग-प्रेसिंग, शेतकऱ्यांना काय फायदा?

| Updated on: Feb 27, 2022 | 12:28 PM

शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानाचा तसेच अधिकचे उत्पादन मिळवून देणाऱ्या वाणांचा शोध लावणे ही जबाबदारी राज्यातील कृषी विद्यापीठांची आहे. कृषी विद्यापीठाच्या पुढाकारामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढही होत आहे शिवाय राज्य सरकारचा उद्देशही साध्य होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने एक अनोख्या मूल्यवर्धन यंत्राची निर्मीतीचे कार्य सुरु आहे.

Agricultural University : काय सांगता? कापसाची तोडणी अन् बांधावरच होणार जिनिंग-प्रेसिंग, शेतकऱ्यांना काय फायदा?
यंदा वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
Follow us on

अहमदनगर : शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानाचा तसेच अधिकचे उत्पादन मिळवून देणाऱ्या वाणांचा शोध लावणे ही जबाबदारी राज्यातील कृषी विद्यापीठांची आहे. (Agricultural University) कृषी विद्यापीठाच्या पुढाकारामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढही होत आहे शिवाय राज्य सरकारचा उद्देशही साध्य होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने एक अनोख्या (Value Addition of Cotton) मूल्यवर्धन यंत्राची निर्मीतीचे कार्य सुरु आहे. यामुळे (Cotton Cutting) कापसाची तोडणी झाली की थेट बांधावरच मूल्यवर्धन करता येणार आहे.जिनिंगच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने सरकी आणि रुई ही शेतकऱ्यांसमोरच वेगळी होणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. रुईच्या टक्केवारीवरच कापसाचे दर ठरत असतील शेतकऱ्यांनाच याचे मूल्यमापन करता येणार आहे.

मोबाईल जिनिंग म्हणजे नेमके काय?

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कापसाचे मूल्यवर्धन थेट शेतकऱ्यांच्यासमोरच व्हावे म्हणून ही मोबाईल जिनिंगची संकल्पाना विद्यापीठाने मांडलेली आहे. यावर विद्यापीठाचे काम सुरु असून त्याचे डिझाईन आणि संयंत्राचे काम हे पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय हे ट्रक्टरचलित असल्याने शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीमध्येच ते बाजारात उपलब्ध होणार आहे. यामुळे थेट शेतकऱ्यांना बांधावरच कापसावर प्रक्रिया करता येणार आहे.

रुईच्या टक्केवारीच ठरतो कापसाचा दर

कापसातील रुईच्या टक्केवारीच दर ठरतात. त्यामुळे कापसामध्ये रुईचे आणि सरकीचे प्रमाण किती आहे याची अचूक माहिती शेतकऱ्यांना नसते शिवाय आपल्याकडे कच्चा कापूस विकला जातो. पण मोबाईल जिनींगमुळे रुई आणि सरकीचे प्रमाण याचे विभाजन करता येणार आहे. एवढेच नाही तर रुईची गुणवत्ता, रुई खराब होण्याचे प्रमाण, फायबर क्वालिटी या सर्व घटकांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे हे अत्याधुनिक यंत्र शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांना असा होणार फायदा

कापसामध्ये एक टक्का जरी रुईचे प्रमाण वाढले तरी 170 रुपये शेतकऱ्यांना जादा मिळणार आहेत. शेतकऱ्यांना रुईचे प्रमाण हे ठरवता येणार आहे. इतर देशामध्ये रुईच्या गाठी करुन विक्री केली जाते पण भारतामध्ये कापसालाच हमीभाव देत त्यानुसार विक्री केली जाते. भविष्यात रुईच्या प्रमाणानुसार दर असे धोरण ठरले तर शेतकऱ्यांनाच याचा अधिकचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : ‘ग्रीन गोल्ड’ने ‘ग्रेप डॅमेज’, 500 टन द्राक्ष मातीमोल..! नेमका काय प्रकार? वाचा सविस्तर

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

Mango : उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्याच्या तोंडावर चाखा आता केसरची चव, कशामुळे ओढावली परस्थिती?