जितेंद्र बैसाणे नंदुरबार : जिल्ह्यात टॅमेटोची (Tomato) आवक वाढल्याने टॅमेटोचे भाव (Tomato rate) घसरले आहेत. नंदुरबार बाजार समितीत शेतकरी कवडीमोल भावात टॅमोटो विक्री करावी लागत आहे. टॅमेटोची आवक वाढल्याने भाव घसरले असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी टॅमेटोवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने, वाईट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली झाली आहे. शेतकऱ्यांकडून दोन ते तीन रुपये किलोने टॅमेटो व्यापारी घेत आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपये किलोनेटॅमेटोची विक्री होत आहे. शेतकरी (farmer) राबून दोन पैसे मिळतील या अशाने शेती करीत असतो. मात्र शेतकऱ्यांना कमी पैसे आणि व्यापाऱ्यांना अधिक पैसे मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शेतीचे काम संपल्यानंतर जिल्ह्यातून नागरिक कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं. जिल्ह्यातील स्थलांतर थांबवण्यात यावं, यासाठी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या अर्थसहाय्याने लखपती किसान मित्र प्रकल्प ही योजना राबवली जाते. या योजनेसाठी लाभार्थींचा मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थलांतर थांबवण्यात येणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात राबवण्यात येणार आहे. या दोन तालुक्यात जवळपास सहा हजारहून अधिक लोकांसाठी हे प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १५ कोटी रूपये खर्च येणार आहे. या मेळाव्यात लाभार्थ्यांना अनेक साहित्य आणि वस्तूंच्या वाटप करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना शेळी पालन, वैयक्तिक विहिरी, सामुहिक विहिरी, सिंचन सुविधा, भाजीपाला बियाणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानात लाभार्थींना वेळेवर धान्य मिळत नाही, उशिरा धान्य मिळतं. मात्र तेही काही मोजक्या लोकांपुरताच धान्य दुकानदाराकडून दिल जात आहे. या संदर्भात नवापूर तालुक्यातील अनेक गावांच्या महिलांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. नवापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आले असल्याने नागरिकांनी थेट तहसील कार्यालय गाठलं आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाडा वाचला. स्वस्त धान्य दुकानदार मनमानी करत आहे. मागील तीन महिन्यांपासून गावातील केवळ ४० ते ५० नागरिकांना स्वस्त धान्य वाटप करतात.