मुंबई : चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारा पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) 12 व्या हप्त्याला वेळ झाला आहे. 2018 नंतर प्रथमच असे झाले असून नवरात्राच्या (Navratra Festival) आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर (Farmer Account) जमा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती. पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. आतापर्यत या योजनेचे 11 हप्ते झाले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती 12 व्या हप्त्याची. नवरात्रीत शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
आतापर्यंत तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. मात्र, जे अपात्र आहेत असेही शेतकरी लाभ घेत असल्याचे निदर्शणास आले असून त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे 12 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची संख्या घटणार असा अंदाज आहे.
अल्पभूधारक आणि गरजवंत शेतकऱ्य़ांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले त्यांच्याच खात्यावर 12 व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे.
केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अनेकांनी योजनेचा लाभ घेतला. पण अशा शेतकऱ्यांकडून आता पैसे वसुल केले जात आहेत. योजनेत पारदर्शकता रहावी यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकही दिला आहे. 155261, 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तर pmkisan-ict@gov.in यावर देखील मेल करता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांनी लागलीच ई-केवायसी हे वेबसाईटवर जाऊन करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मात्र, अनिवार्य असून शेतकऱ्यांना ते करावेच लागणार आहे.