नवी दिल्ली : भारतात परंपरागत शेतीकडून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड आणि राजस्थानसह इतर राज्यात शेतकरी आंबे, पेरू, सफरचंद, आवळा आणि हिरवा भाजीपाला काढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाबद्दल आपण आता पाहणार आहोत. हिरव्या भेंडीसारखी लाल भेंडीची शेती केली जाते. श्रीमंत आणि पैसेवाले लोकं लाल भेंडी खरेदी करतात. काही राज्यात शेतकरी लाल भेंडीचे उत्पन्न घेतात. लाल भेंडीत हिरव्या भेंडीपेक्षा जास्त व्हिटामीन आणि पोषक तत्व मिळतात. अशावेळी एखादा शेतकरी लाल भेंडीची शेती करत असेल तर त्याचा नक्कीच फायदा होता.
भेंडीची लागवड वर्षातून दोन वेळा केली जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भेंडीची लागवड केली जाते. तसेच जून- जुलै महिन्यात भेंडीची लागवड केली जाते. हिरव्या भेंडीसारखीचं लाल भेंडीची लागवड केली जाते. पाणी काढण्याची व्यवस्था हवी. शेतात पाणी भरले असल्यास भेंडीचे नुकसान होते. लाल भेंडीच्या शेतीसाठी मातीचा पीए ६.५ ते ७.५ असावा लागतो.
लाल भेंडीत क्लोरीफिलच्या ऐवजी एंथोसायनीस अधिक प्रमाणात असतो. ही भेंडी पाहावयास लाल दिसते. कॅल्शीयम, आयरन, झिंक जास्त प्रमाणात असतो. लाल भेंडी खाल्याने शरीर स्वस्थ आणि मजबूत राहतो. लाल भेंडी नेहमी १०० रुपये किलोच्या भावाने विक्री होते. जास्त भाव असल्यास ४०० ते ५०० रुपये किलोही लाल भेंडीचे भाव असतात. एका ऋतूमध्ये ५० ते ६० टक्के लाल भेंडीचे उत्पन्न होते. एका ऋतूत ५० ते ६० क्विंटल लाल भेंडीचे उत्पादन होते. एका ऋतूमध्ये तुम्ही २५ लाख रुपये उत्पादन घेऊ शकता.
भाजीपाला आणि फळे लागवडीकडं लोकं वळत आहेत. त्यात भेंडी ही चांगले उत्पादन देते. लाल भेंडीमध्ये जास्त पोषक तत्व असतात. त्यामुळे लाल भेंडीची मागणी जास्त आहे. त्यामुळे लाल भेंडीची लागवड केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.