Millet Crop : बाजरी उत्पादन वाढीची सोपी पध्दत, पेरणीपासून काढणीपर्यंतचे असे करा नियोजन

| Updated on: Jan 18, 2022 | 7:10 AM

मुख्य पिकांमध्ये आंतरपिक म्हणून बाजरीचे उत्पन्न घेतले जात होते. पण काळाच्या मानवी शरिरासाठी बाजरी ही उपयुक्त असल्याचे निदर्शनास आल्याने मागणी वाढली असून बाजारपेठेतले महत्वही वाढले आहे. मात्र, बाजरी हे कायम दुय्यमच पीक राहिले आहे. रोजच्या आहारात बाजरीचा वापर हा वाढलेला आहे.

Millet Crop : बाजरी उत्पादन वाढीची सोपी पध्दत, पेरणीपासून काढणीपर्यंतचे असे करा नियोजन
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : मुख्य पिकांमध्ये आंतरपिक म्हणून (Bajra Crop) बाजरीचे उत्पन्न घेतले जात होते. पण काळाच्या मानवी शरिरासाठी बाजरी ही उपयुक्त असल्याचे निदर्शनास आल्याने मागणी वाढली असून बाजारपेठेतले महत्वही वाढले आहे. मात्र, बाजरी हे कायम दुय्यमच पीक राहिले आहे. रोजच्या आहारात बाजरीचा वापर हा वाढलेला आहे. (Kharif Crop) मात्र, हलक्या जमिनित लागवड, खतांचा अल्प प्रमाणात वापर, कमी मशागत, आंतरपीक व जलसंवर्धन उपायांचा अभाव यामुळे उत्पादकता कमी आहे. त्यामुळे उत्पादनवाढीसाठी आलेल्या उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. बाजरी हे पीक प्रामुख्याने अन्न व चारा पीक म्हणून घेतात. कमी पाऊस व मका, सोयाबीन पिकाखाली वाढलेले क्षेत्र यामुळे बाजरी पिकांच्या क्षेत्रामध्ये मागील काही वर्षाच्या तुलनेत घट दिसून आली आहे.

या वाणाचे आहे महत्व

संकरीत वाण: श्रद्धा हे वाण 75-8O दिवसांत पक्के होते. मध्यम उंचीचा, कणीस सर्वसाधारण गच्च, कणसावर केस असून, नारंगी आहे. गडद करड्या रंगाचे दाणे असतात. तर सबुरी हे वाण मध्यम भारी जमिमीसाठी योग्य आहे. हे वाण 85 ते 90 दिवसांत तयार होते. प्रतिभा ( एएचबी -1666 ) हे वाण 75-80 दिवसांत तयार होत असून मध्यम वाढ होते. या वाणाच्या बाजरीच्या दाण्यांचा आकार मध्यम असून रंग हिरवट आहे.

सुधारीत वाण : समृध्दी हे वाण 85- 90 दिवसांत तयार होत असून या वाणाची बाजरी उंच वाढते तर दाण्यांचा रंग हिरवट असतो. परभणी संपदा हे वाण मध्यम उंचीचे असून 85 ते 9O दिवसांत तयार होते तर आयसीटीपी 8203 हे वाण 85- 90 दिवसांत तयार होणारे असून ही बाजरी ऊंच वाढते तर कणसे ही दाट असतात.

बिजप्रक्रिया :

पेरणीपूर्व बिजप्रक्रिया ही महत्वाची क्रिया आहे. याकरिता 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बिजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास 20 टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी दहा लिटर पाण्यात दोन किलो मीठ विरघळवावे लागणार आहे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून नाश करावा. तळाला असलेले निरोगी व वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने दोन -तीन वेळा धुवावे लागणार आहे. त्यानंतरच सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे लागणार आहे.

ही आहे पेरणीची योग्य वेळ

बाजरी हे खरीप हंगामातील पीक आहे. पेरणी ही सरी वरंबा पद्धत किंवा सपाट वाफे पध्दतीने करावी लागते. पेरणी 2 ते 3 सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. मॉन्सूनचा पहिला चांगला पाऊस झाल्यावर लगेच पेरणी करावी लागते. पेरणीसाठी हेक्टरी 3 -4 किलो बियाणे पुरेसे आहे. दोन ओळीत 45 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 15 सें.मी. ठेऊनच पेरणी केल्यावर उत्पादनात वाढ होणार आहे. नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा जेथे पाण्याची सोय असेल तेथे 30 x 15 सेंमी. अंतरावर पेरणी करावी. अशा पध्दतीने नियोजन करुन बाजरीचा पेरा केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. (संबंधित माहिती बाजरी संशोधन योजना, कृषी महाविद्यालय धुळे यांच्या पुस्तकाच्या आधारे घेतली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच अवलंब करावा)

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : राज्यात 5 लाख टन ऊसाचे गाळप, ‘या’ विभागाची आघाडी कायम

शेतकऱ्यांचा नाद खुळा : कांद्याने झाली भरभराट, घरावर 150 किलोचा ‘स्टॅच्यू’ उभारुन केली उतराई

Pomegranate Orchard : तेल्याचा सामना करण्यापेक्षा डाळिंब बागा तोडलेल्या बऱ्या, का होत आहेत शेतकरी हतबल?