नागपूर : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांच्या वतीने जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, लाखनी, पवनी आणि लाखांदूर या पाच बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. मात्र, पाच बाजार समित्यांपैकी सर्वात श्रीमंत तुमसर बाजार समितीची निवडणूक अधिक चुरशीची आणि खर्चीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत येथील खरेदी-विक्रीचे नियमन होत असते. तांदळाबरोबर कडधान्य आणि गुळाचा तसेच जनावरांचा मोठा व्यापार या बाजार समितीअंतर्गत होतो. जवळपास दीड वर्षानंतर प्रशासकराज संपून बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी आपल्या पक्षाचे वर्चस्व स्थापित व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले.
नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात झाली आहे. अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी 341 अर्जांची विक्री झाली. इच्छुक उमेदवारांना येत्या 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या निवडणुकीसाठी किमान दहा गुंठे जमीन असेल आणि शेतकरी असल्याचा पुरावा असेल. शेतकऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यातील नाशिक पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव या बाजार समितीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पाचोऱ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस समिती बचाव पॅनल तयार करणार असून, स्वबळावर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवणार आहे.
नांदेडमध्ये काँग्रेस विरोधात भाजप असाच सामना बाजार समितीच्या निवडणुकीत होईल, अशी तयारी दोन्ही पक्षांकडून आहे. मात्र राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्यासाठी आग्रह धरलाय. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकानेही उमेदवारी दाखल केली नाही.
नंदुरबार जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे. नंदुरबार बाजार समिती सर्वात मोठी बाजार समिती आहे. यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे बाजार समितीवर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
बाजार समितीवर पुन्हा आपले सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शिवसेना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.