नांदेड : शासकीय काम अन् चार दिवस थांब ही म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. असे असले तरी काम होणारच हे नक्की, सध्याच्या पीकविम्याच्या अनुशंगाने हे घडताना दिसत आहे. (Kharif Season) खरिपात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी काढलेल्या (Crop Insurance) विम्याची रक्कम त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतू, पीक पाहणी, पंचनामे आणि नंतर दीपावलीमध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. या दरम्यान, 75 टक्केच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती आता उर्वरीत रक्कमही शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Marathwada) मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे तर आता नांदेड जिल्ह्यासाठी 331 कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
खरीप हंगामातील पीके अंतिम टप्प्यात असतानाच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेती पिकाच्या उत्पादनात तर घट झालीच पण शेतजमिनीही खरडून गेल्याचे प्रकार समोर आले होते. सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. याच पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. पण निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका याच पिकाला बसला होता. त्यामुळे त्वरीक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पण त्यानंतर पंचनामे, पीक पीहणी, शेतकऱ्यांचे दावे केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 75 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. तर उर्वरीत 25 टक्के निधी पुढील टप्प्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.
जिल्हाभरातील शेतकऱ्यांना उर्वरीत रकमेचा फायदा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खरीप हंगामाचा नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत सुरुवातीला 461 कोटींचा पीकविमा मंजूर झाला होता. आता 331 कोटी रुपये पिकविम्यासाठी मंजूर झाले आहेत. काही दिवसांमध्येच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याकरिता पुन्हा सर्वकाही प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही विमा कंपन्याकडून पूर्तता होताच निधीचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
उर्वरीत 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे खरीप नुकसानीची भरपाई अखेर उशीरा का होईना शेतकऱ्यांना मिळालेली आहे. इतर शेतकऱ्यांनाही याचा लवकरच लाभ मिळेल असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे.
Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार ‘एंट्री’, केशरच्या मागणीतही वाढ
Lasalgoan : शेतकऱ्यांकडूनच कांदा मार्केट बंद, बाजार समिती प्रशासनही हतबल, नेमके कारण काय ?
Latur Market : सोयाबीन दराचा पुन्हा चढता आलेख, शेतकऱ्यांसमोरील समस्या मात्र कायम..!